– तपासातून समोर आले धक्कादायक खुलासे
Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपी सिया गोयल साखरपुड्यापूर्वी तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीसोबत उदयपूरला गेल्याची माहिती समोर आली आहे. या सहलीदरम्यान दोघांनी मित्रांसोबत जवळपास पाच दिवस घालवले होते. या प्रवासानंतरच केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला गेला असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे. (Ketan Agrawal Murder Case)
साखरपुड्याआधी उदयपूरला सहल :
तपासानुसार, फेब्रुवारीमध्ये केतन अग्रवालसोबत साखरपुडा होण्यापूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी मित्रमंडळीसह उदयपूरला गेले होते. या सहलीतील त्यांच्या हालचाली आणि संपर्कांची माहिती पोलिसांनी गोळा केली असून, या प्रवासाचा तपासात महत्त्वाचा धागा मानला जात आहे. (Ketan Agrawal Murder Case)
https://prahaar.in/2026/06/29/ketan-agarwal-murder-case-new-revelation-in-the-ketan-agarwal-murder-case-methods-of-murder-were-searched-for-on-google-and-practice-was-carried-out-at-a-fort/
जानेवारीतही राजस्थानमध्ये एकत्र प्रवास :
पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. उदयपूरच्या सहलीपूर्वी जानेवारी महिन्यातही सिया आणि चेतन राजस्थानातील एका ग्रुप ट्रिपमध्ये एकत्र सहभागी झाले होते. या कालावधीत दोघांमधील संबंध अधिक दृढ झाले आणि त्याच काळात पुढील कटाची रूपरेषा तयार झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (Ketan Agrawal Murder Case)
कॉल रेकॉर्ड आणि प्रवासाच्या नोंदींची तपासणी :
हत्येचा कट नेमका कधी आणि कसा रचला गेला, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस दोन्ही आरोपींच्या प्रवासाच्या नोंदी, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांची सखोल तपासणी करत आहेत. दोघांमधील संपर्काचा संपूर्ण कालक्रम उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Ketan Agrawal Murder Case)
लग्न नको होते, चौकशीत कथित कबुली :
पोलिसांच्या सूत्रांनुसार, चौकशीदरम्यान सिया गोयलने केतन अग्रवालशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आहे. मात्र, कुटुंबीय आणि सामाजिक दबावामुळे हे नाते मोडता येत नसल्याचे तिने कथितरित्या नमूद केले. तसेच, केतनचा मृत्यू झाल्यास काही वर्षे तरी पुनर्विवाहासाठी कुटुंबाकडून दबाव येणार नाही, असा विचार तिच्या मनात असल्याचा दावा तपासादरम्यान समोर आला आहे. (Ketan Agrawal Murder Case)
https://prahaar.in/2026/06/29/saudi-arabia-helicopter-crash-aramco-helicopter-crashes-in-saudi-arabia-14-people-tragically-killed/
बदनामीच्या भीतीतून कट रचल्याचा संशय :
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, लग्न मोडल्यास समाजात आणि कुटुंबात बदनामी होईल, अशी भीती दोघांनाही होती. त्यामुळे नाते संपवण्याऐवजी केतन अग्रवालचा काटा काढण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या सर्व बाबींची पोलीस अद्याप पडताळणी करत असून, अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. (Ketan Agrawal Murder Case)
सध्या या प्रकरणात पोलीस प्रत्येक पुरावा बारकाईने तपासत असून, आरोपींच्या प्रवास, संवाद आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहितीही तपासाच्या कक्षेत आणण्यात आली आहे. या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ketan Agrawal Murder Case)