पुणे : पुण्यातील रिअल इस्टेट (Real Estate) व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात दिवसेंदिवस नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तांत्रिक (Technical) आणि डिजिटल (Digital) तपासातून आरोपींनी हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी गूगल (Google) वर हत्येच्या विविध पद्धती शोधल्या, संबंधित व्हिडिओ (Video) पाहिले आणि गुन्ह्यापूर्वी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष सरावही केला होता.
तपासात असेही उघड झाले आहे की, मुख्य आरोपींनी १४ जून रोजी केतन अग्रवाल यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी पुन्हा नियोजन करून गुन्हा घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या गूगल सर्च हिस्ट्री (Google Search History) मधून हत्येशी संबंधित माहिती शोधल्याचे आढळले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन गुन्हा कसा करायचा याचा सरावही केला होता.
https://prahaar.in/2026/06/28/tet-paper-leak-case-three-accused-remanded-to-police-custody/
तपासात आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना कोणती उत्तरे द्यायची याचाही आधीच सराव केल्याचे समोर आले आहे. तसेच संशय टाळण्यासाठी वेषांतर (Disguise) करण्याचाही त्यांनी कट आखल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात सिया गोयलने केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचे नसल्याचे सांगितले. लग्न मोडल्यास कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीतून तिने चेतन चौधरीसोबत मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
गुन्ह्यानंतर आरोपींनी चॅट्स (Chats) आणि इतर डिजिटल (Digital) पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. सध्या पुणे ग्रामीण पोलीस डिजिटल (Digital) आणि तांत्रिक (Technical) पुराव्यांच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे नेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर आरोपींसोबत घटनास्थळाची पुनर्रचना (Crime Scene Reconstruction) केली. या वेळी केतन अग्रवाल यांना किल्ल्यावरून नेमके कसे ढकलण्यात आले, आरोपींच्या हालचाली काय होत्या आणि संपूर्ण घटना कोणत्या क्रमाने घडली, याची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video Recording) देखील करण्यात आले.
https://prahaar.in/2026/06/28/poison-capsule-case-psycho-killers-masterplan-in-the-poison-capsule-distribution-case-asked-ai-inappropriate-questions/
पोलिसांनी डमी (Dummy) चा वापर करून आरोपींकडून संपूर्ण घटनेचे प्रात्यक्षिक (Demonstration) करून घेतले. आरोपींच्या जबाबांची घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांशी पडताळणी करण्यात आली असून, गुन्ह्यामागील हेतू, कट आणि आरोपींच्या हालचालींचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनास्थळावरील पुनर्रचनेदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लोहगड किल्ला काही काळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.