केडगाव (पुणे): दौंड तालुक्यातील गाजलेल्या गर्भलिंगनिदान रॅकेटचे जाळे आता अधिक विस्तारात असून, याचे धागेदोरे फलटणपर्यंत पोहोचले आहेत. मुख्य आरोपी अण्णा गिरी याच्या तपासातून फलटणमधील एका डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली समांतर रॅकेट कार्यरत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या मास्टरमाईंडने प्रशिक्षित केलेल्या तोतया डॉक्टरांनी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत मोबाइल व्हॅनद्वारे अवैध लिंगनिदानाचे जाळे पसरवल्याचे उघड झाले आहे.
https://prahaar.in/2026/06/29/ind-vs-ire-t20i-india-suffers-a-shock-defeat-in-the-t20-series-against-ireland-where-did-team-india-go-wrong/
मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
पोलिसांनी सध्या गिरीशी संबंधित संशयित डॉक्टरांवर आपला तपास केंद्रित केला आहे. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. अटकेतील काही आरोपींची ओपीडी मर्यादित असली तरी त्यांची अमाप संपत्ती पोलिसांच्या नजरेत आली आहे. एका आरोपी डॉक्टरचे तब्बल सात कोटींचे रुग्णालय सध्या निर्माणाधीन आहे.
https://prahaar.in/2026/06/29/maharashtra-monsoon-update-strong-return-of-the-monsoon-in-the-state-alert-issued-for-22-districts-warning-of-heavy-rain-accompanied-by-thunderstorms-in-several-regions-including-vidarbha-and-konk/
गुन्हेगारीचे ‘पॅटर्न’ आणि संशयास्पद हालचाली
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्या पाच डॉक्टरांपैकी सर्व जण पती-पत्नी आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या रुग्णालयांबाहेर स्थानिक वाहनांपेक्षा (MH-42 पासिंग) बाहेरील जिल्ह्यांतील वाहनांची वर्दळ मोठी असायची.
https://prahaar.in/2026/06/29/saudi-arabia-helicopter-crash-aramco-helicopter-crashes-in-saudi-arabia-14-people-tragically-killed/
कोणावर झाली कारवाई?
या प्रकरणात आतापर्यंत खालील व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे:
-
डॉ. सुमंत शितोळे: (मंगलमूर्ती हॉस्पिटल, पारगाव)
-
डॉ. सुंदरम कदम: (फरार)
-
बापू जांबले
या प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी पाहता, डॉ. शितोळे हे एका राजकीय घराण्याशी संबंधित आहेत, तर डॉ. कदम हे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे पुत्र आहेत. तसेच, एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या डॉक्टर बहिणीवरही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
https://prahaar.in/2026/06/29/bmc-school-operating-on-the-premises-of-a-maternity-home-allotted-on-a-ppp-basis-in-gokuldham/
पोलिसांची भूमिका
याबाबत अधिक माहिती देताना यवतचे पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर म्हणाले की, “मुख्य आरोपी अण्णा गिरीने तपासादरम्यान फलटणमधील एका डॉक्टरकडून गर्भलिंगनिदानाचे प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली आहे. आम्ही सध्या या पुराव्यांच्या दिशेने तपास करत असून, ठोस पुरावे हाती लागताच संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई केली जाईल.”
सध्या नागरिकांकडून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयास्पद रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.