Home क्रीडा WI VS SL : वेस्ट इंडिजने रचला इतिहास ! टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील १४९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

WI VS SL : वेस्ट इंडिजने रचला इतिहास ! टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील १४९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

WI VS SL : वेस्ट इंडिजने रचला इतिहास ! टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील १४९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

बार्बुडा: वेस्ट इंडिजच्या कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामना सध्या सुरू आहे. दुसऱ्या डावात ३०८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोन्ही फलंदाज, अमीर जांगू आणि कर्णधार रॉस्टन चेस यांनी सहाव्या विकेटसाठी ४०१ धावांची मोठी भागीदारी केली. (West Indies)

https://prahaar.in/2026/06/28/actor-satendra-soni-shocking-allegation-by-laapataa-ladies-actor-satendra-soni-assaulted-after-asking-for-his-remuneration-thrown-out-of-the-hotel/



सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी

आमीर जांगूने यानी आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात ३७३ चेंडूंमध्ये २३३ धावा करीत मॅरेथॉन खेळी केली आहे. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोस्टन चेसने टीमची धुरा सांभाळत ३२४ चेंडूंमध्ये १९४ धावा केल्या. या दोघांच्या जोडीने मिळून इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्स(Ben Stokes) यांचा आठ वर्षाचा जुना रेकॉर्ड मोडीत काढला आहे. कसोटी क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात सहाव्या विकेटसाठी 400 किंवा त्याहून अधिक रन्सची पार्टनरशिप करणारी ही जगातील पहिलीच जोडी ठरली आहे. या दोन्ही खेळाडूंनी चतुराईने खेळत नव्या विक्रमाला गवसणी घातली. वेस्ट इंडिजच्या आमीर जांगू आणि कॅप्टन रोस्टन चेस या जोडीने मैदानावर असा पराक्रम केला आहे, जो कसोटी क्रिकेटच्या तब्बल 149 वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही घडला नव्हता.

https://prahaar.in/2026/06/28/many-financial-rules-will-change-from-july-1st-find-out-if-your-pocket-will-be-affected/

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातीस दुसरी सर्वात मोठी भागिदारी

कॅरेबियन देशाच्या कसोटी इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची हा दुसरी सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. वेस्ट इंडिजसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा रेकॉर्ड कॉनराड हंट आणि गॅरी सोबर्स (465 रन्स) यांच्या नावावर आहे. श्रीलंके विरोधातही कसोटी इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. साल १९९१ मध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन क्रो आणि अँड्रयू जोन्स या दोघांही मिळून श्रीलंकेविरुद्ध ४६७ धावा केल्या होते.