मुंबई : नेहमी गजबलेले ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या ठिकाणी लाखो प्रवासी दिवस रात्र ये जा करत असतात. मात्र या गर्दीच्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती चक्क कोयता फिरवत प्रचंड गर्दीतून धमकी देत फिरत होती. या कोयता घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पण एका पोलिसाने धाडस केले आणि कोयता मॅनच्या हातातून कोयता ताब्यात घेतला. यानंतर कोयता मॅनला तातडीने पकडण्यात आले.
https://prahaar.in/2026/06/28/a-heart-wrenching-accident-she-got-off-the-bus-and-the-moment-she-crossed-the-road-a-horrific-incident-occurred/
पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला
शनिवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
View this post on Instagram
परिसरात एका सशस्त्र व्यक्तीने आरडाओरडा करत जमावावर आणि त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेला कोयता दाखवत धमकावण्या सुरुवात केली. हा प्रकार बघून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अखेर एका पोलिसाने धाडस करुन स्थानिकाच्या मदतीने पुढे जात कोयता घेऊन फिरणाऱ्याच्या हातून कोयता काढून घेतला. कोयता जप्त केल्यानंतर सहकारी पोलसांच्या मदतीने कोयता मॅनला लगेच पकडण्यात आले.
https://prahaar.in/2026/06/28/palghar-district-set-to-become-the-states-growth-engine-due-to-select-projects/
कारवाई करणारे अधिकारी हे एलए-२(ALA 2) युनिटमध्ये कार्यरत असलेले आणि सध्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले कॉन्स्टेबल विशाल यशवंत गाडे (Vishal Yashwant Gade) आहेत. कामावर जात असतानाच गाडेंना कोयता हाती घेऊन धमकावत असलेली व्यक्ती दिसली.पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे पुढील संभाव्य दुर्घटना टळली.
पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी कोयता फिरवणे, धमकावणे आदी प्रकरणांत गुन्हा नोंदवून कोयता मॅन विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या कोयता मॅनची कसून चौकशी सुरू आहे.