Home क्राईम Kolhapur Crime News : पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur Crime News : पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Kolhapur Crime News : पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
Kolhapur Gaming Zone Crime

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गंगावेश ते रंकाळा स्टँड मार्गावरील पाडळकर मार्केटसमोरील Video Game Parlour वर जुना राजवाडा पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या २१ Gaming Machines, DVR, नोंदणी Register आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी पार्लरचा मालक असलेल्या माजी नगरसेवकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांना पवित्रा Video Game Parlour मध्ये विनापरवाना जुगार (Gambling) सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने दुपारी छापा टाकला. त्यावेळी पार्लरमध्ये काही युवक व्हिडिओ गेम खेळताना आढळले. तपासादरम्यान वेगवेगळ्या कंपन्यांच्या २१ गेमींग मशीन (Gaming Machines) जप्त करण्यात आल्या.

https://prahaar.in/2026/06/28/venezuela-hit-by-another-earthquake-after-a-7-5-magnitude-quake-a-4-8-magnitude-tremor-strikes-death-toll-rises-to-1430/

प्राथमिक तपासात एक रुपयाला आठ रुपये देण्याचे आमिष दाखवून जुगार चालवला जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी पार्लर चालक रुद्राक्ष रणवीर जानकर, मालक तथा माजी नगरसेवक अजिंक्य शिवाजीराव चव्हाण, तसेच गेम खेळण्यासाठी आलेले चार जण आणि जागा मालक अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, Video Game Parlour चालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर विभागाची परवानगी आवश्यक असते. या मशीनमध्ये कोणतेही तांत्रिक फेरफार (Technical Manipulation) करण्यात आले होते का, याची चौकशी आता करमणूक कर विभागाकडून केली जाणार आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here