मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
न्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू असून 27 जून रोजीही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. दरम्यान, 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
https://prahaar.in/2026/06/27/whether-elderly-or-a-student-the-ncmc-card-will-be-mandatory-for-availing-concessions-starting-august-1st/
कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या चारही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता कायम आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/06/27/secretary-kiran-pawaskar-uddhav-thackeray-should-undertake-an-apology-tour/
नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.