Home ब्रेकिंग न्यूज मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

0
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या संख्यात भर करण्यात आली आहे. जूनच्या २९ तारखेपासून १२ नवीन एसी लोकल या मार्गावरून धावणार आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल निला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या बदलामुळे आता मध्ये रेल्वे मार्गावरील एकूण एसी लोकल सेवांची संख्या ९२ वर पोहली आहे. मध्य रेल्वे मार्गावर ८० एसी लोकल धावत आहेत. तर हार्बर मार्गावर २८ एसी सेवा सुरू आहेत.

https://prahaar.in/2026/06/27/farm-loan-waiver-farmers-maharashtra-farmers-loan-waiver-agriculture-farmer-welfare-maharashtra-government-agricultural-scheme-rural-development-crop-loan-financial-relief-maharashtra-news/

नवीन एसी लोकलचे वेळापत्रक

या 12 एसी लोकल सोमवार ते शनिवार चालवल्या जातील. या लोकल गाड्या सोमवार पासून शनिवार पर्यंत एसी मार्गावर धावतील. तर रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या गाड्या नॉन-एसी मार्गावर धावतील.

12 नवीन एसी लोकलचे वेळापत्रक :

1. 96612 TL 12 – टिटवाळा ते CSMT, सकाळी 06:46 ते 08:31

2. 97502 G 2 – घाटकोपर ते CSMT, सकाळी 09:16 ते 09:53

3. 97618 C 18 – कुर्ला ते CSMT, दुपारी 16:34 ते 17:08

4. 97408 T 116 – ठाणे ते CSMT, संध्याकाळी 18:16 ते 19:14

5. 97164 CK 8 – कल्याण ते कुर्ला, रात्री 21:04 ते 22:03

6. 97630 C 30 – कुर्ला ते CSMT, रात्री 22:22 ते 22:53

https://prahaar.in/2026/06/27/deputy-chief-minister-eknath-shinde-extended-a-helping-hand-to-a-motorcyclist-who-had-met-with-an-accident-while-returning-from-raigad-fort/

डाऊन दिशेकडे :

1. 96603 TTL 1 – ठाणे ते टिटवाळा, सकाळी 05:35 ते 06:23

2. 97501 G 1 – CSMT ते घाटकोपर, सकाळी 08:37 ते 09:12

3. 97615 C 15 – CSMT ते कुर्ला, सकाळी 10:00 ते 10:28

4. 97389 T 89 – CSMT ते ठाणे, संध्याकाळी 17:12 ते 18:08

5. 97157 K 115 – CSMT ते कल्याण, संध्याकाळी 19:18 ते 20:49

6. 97433 T 133 – CSMT ते ठाणे, रात्री 23:00 ते 23:57

सध्या मध्ये रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावर एसी गाड्यांना प्रवाशांचा चांगली प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. तसेच मध्ये रेल्वे मार्गावर एसी गाड्यांची मागणी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,असे रेल्वे प्रशासनाने सांगीतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here