Home ब्रेकिंग न्यूज Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

0
Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात
eknath

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून महाडकडे परत येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shine) यांनी रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या बाईकस्वराला आपला ताफा थांबवत मदतीचा हात देऊ केला. यावेळी शिंदे यांनी स्वतः गाडीतून उतरून या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस करून त्यांना ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

https://prahaar.in/2026/06/27/mahavitarans-power-plan-for-simhastha-is-ready/

रायगड(raigad) किल्ल्यावरील कार्यक्रम आटपून खाली आल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी शासकीय ताफ्यातून महाडकडे रवाना झाले. महाड पाचाड या निर्जन रस्त्यावरून जात असताना अचानक त्यांना रस्त्याच्या कडेने जाणारी बाईक रस्त्याच्या कडेला पडलेल्या मातीवरून घसरून पडल्याचे दिसले. क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून आपल्या अधिकाऱ्यांना त्या बाईक स्वारांची चौकशी करायला सांगितले. यानंतर गाडी वळवून ते स्वतः गाडीतून खाली उतरले. बाईकस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणाची त्यांनी आस्थेने विचारपूस केली.

https://prahaar.in/2026/06/27/farm-loan-waiver-farmers-maharashtra-farmers-loan-waiver-agriculture-farmer-welfare-maharashtra-government-agricultural-scheme-rural-development-crop-loan-financial-relief-maharashtra-news/

यानंतर त्यांना पाणी देऊन कुठल्या गावातील आहेत ते विचारले. सुदैवाने दोघांनी हेल्मेट घातले असल्याने गाडी घसरूनही दोघांना गंभीर दुखापत झालेली नव्हती. मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या पायाला लागलेले पाहून त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका बोलवून आपल्या एका कार्यकर्त्यांच्या साथीने दोन्ही बाईकस्वारांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तसेच त्यांच्यावर झालेल्या उपचाराबाबत आपल्याला फोन करून सांग असेही आपल्या कार्यकर्त्याला बजावले..यानंतर ते आपल्या गाडीत बसून ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

सर्वसामान्य माणसांच्या मदतीला धावून जाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीच मागे नसतात. याचा प्रत्यय आजवर अनेकदा आला आहे. मात्र शिवछत्रपतींचा पायी नतमस्तक होऊन आलेल्या शिंदेंनी त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाईक स्वाराला मदतीचा हात देत आपल्यात जपलेल्या संवेदनशील मावळा आजही जागा असल्याचे या कृतीमधून दाखवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here