Home ब्रेकिंग न्यूज Omraje Nimbalkar : मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही!

Omraje Nimbalkar : मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही!

0
Omraje Nimbalkar : मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही!
Omraje Nimbalkar,

ओमराजे निंबाळकर; सामान्य माणसाच्या कामातून टीकेला उत्तर देईन

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या दोन खासदारांना लॉटरी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे(shrikant shinde) आणि अलिकडेच शिवसेनेत दाखल झालेल्या ओमराजे निंबाळकर यांची नावे त्यात अग्रक्रमावर आहेत. याबाबत विचारले असता निंबाळकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नसून, सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघातील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे,” असे ते म्हणाले.

https://prahaar.in/2026/06/27/a-journey-that-used-to-take-30-to-40-minutes-will-now-take-just-15-minutes-kalyan-shilphata/

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेवर बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर(omraje nimbalkar) म्हणाले, “मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही, हे मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करतो. माझा मुख्य उद्देश मतदारसंघाला प्रगतीपथवर नेणे हाच आहे. दुर्दैवाने धाराशिव जिल्हा हा देशातील मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्याचा विकास करायचा असेल, तर त्याला सत्तेची जोड आवश्यक होती आणि म्हणूनच सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सत्तेच्या बाजूने येण्याचा निर्णय घेतला.”

https://prahaar.in/2026/06/27/sharad-pawar-faction-mp-bajrang-sonawane-met-the-chief-minister/

उबाठा गटातून बाहेर पडल्यामुळे होत असलेल्या टीकेला आपण कामातूनच उत्तर देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “मी रोज सामान्य जनतेच्या संपर्कात असतो. त्यांच्या अडचणी फार मोठ्या आहेत. आता उपमुख्यमंत्र्यांच्या पाठींब्यामुळे आणि सत्तेच्या ताकदीमुळे मला ही प्रलंबित कामे अधिक वेगाने करता येतील. माझ्यावर होणाऱ्या सर्व टीकेला मी सर्वसामान्यांच्या विकासकामांतून उत्तर देईन,” असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना बळकट करण्यावर भर – श्रीकांत शिंदे
दुसरीकडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “हे सगळे तुम्हीच (माध्यमे) तयार करीत आहात. आमच्यासाठी मंत्रिपदे आणि जागा या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. पक्ष कसा वाढेल, यासाठीच आम्ही अहोरात्र काम करत आहोत. गेल्या १० दिवसांत मी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा केला असून, येणाऱ्या काळात विदर्भाचाही दौरा करणार आहे. आतापर्यंत मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी राज्यातील ६२ विधानसभा मतदारसंघांचा दौरा पूर्ण केला आहे. आगामी काळात शिवसेना कशी ताकदवान होईल, या एकाच गोष्टीवर आमचे पूर्ण लक्ष केंद्रित आहे,” असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here