महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आयोगाच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांनी ही माहिती मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
https://prahaar.in/2026/06/26/thats-why-i-pushed-him-off-lohagad-siya-revealed-everything-to-the-police/
आयोगाने परीक्षांतील विलंब कमी करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येक पूर्व परीक्षेचा निकाल २१ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल २२ दिवसांत जाहीर करण्यात आला असून, पुढील सर्व परीक्षा २१ दिवसांच्या आत निकालासह पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
घेतलेल्या परीक्षांचा निकाल त्याचवर्षी
भरती प्रक्रिया देखील अधिक वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मुलाखत असलेल्या पदांसाठी ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांसाठी ६ ते ७ महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/26/major-achievement-by-mumbai-police-officer-sambhaji-gurav-scales-denali-the-highest-peak-in-north-america/
आयोगाने स्पष्ट केले की, हा बदल फक्त पूर्व परीक्षांसाठी लागू असेल. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने घेतल्या जातील.
विवेक भीमनवार यांनी सांगितले की, CBT आणि नॉर्मलायझेशन ही नवी पद्धत नाही. आयोगाने यापूर्वीही सुमारे १४० परीक्षा या पद्धतीने यशस्वीपणे घेतल्या आहेत. तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB), स्टेट CET सेल आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांसारख्या संस्थाही हीच पद्धत वापरत आहेत.
या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होईल. तसेच उमेदवारांना निकाल आणि भरतीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला.