मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा; आवाजात सुधारणा करण्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला
मुंबई : ‘ऑपरेशन टायगर २.०’ अंतर्गत उबाठा गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता ‘ऑपरेशन टायगर ३.०’ अंतर्गत १२ आमदार फुटतील, असा दावा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. “खासदार तर फक्त सुरुवात होती, आता ‘उबाठा’ गटाचे १४ हून अधिक आमदार लवकरच शिवसेनेत दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) फार काही बोलत नाहीत, त्यांनी फक्त आपल्या दाढीवर हात फिरवला की ‘ऑपरेशन टायगर ३.०’ यशस्वी होईल,” असे गुलाबराव म्हणाले.
https://prahaar.in/2026/06/26/lonavala-murder-case-accused-siyas-parents-take-a-stern-stand-if-found-guilty-push-our-daughter-into-the-same-valley-too/
फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या दौऱ्यांवर खोचक टोला लगावताना गुलाबराव पाटील म्हणाले, “दौरे केलेच पाहिजेत, त्याशिवाय राजकारणात काम होत नाही. पण आता मुलाला (आदित्य ठाकरे) जमत नाही, म्हणून बिचाऱ्या बापाने (Uddhav Thackeray) तरी बाहेर पडायला हवे. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मैदानात उतरून काम करणारा आणि सतत जनतेत फिरणारा नेता म्हणून आज एकनाथ शिंदेंचे नाव आहे. म्हणूनच ते आज लाडक्या बहिणींच्या, भावांच्या, शेतकऱ्यांच्या आणि वारकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.”या वेळी त्यांनी ‘ऑपरेशन ३.०’ वरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंची नक्कल केली. “अरे राजा, आमच्यावर टीका करण्यापूर्वी आधी स्वतःचा आवाज तर सुधरव! वाघासारखं बोलायला आणि आव्हान द्यायला गुलाबराव पाटलांसारखा पहाडी आवाज लागतो,” असा टोमणा त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
https://prahaar.in/2026/06/26/nashikyouth-murdered-again-over-an-old-dispute/
खासदार संजय दीना पाटलांचे कान टोचले
शिवसेना खासदार संजय दीना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना पोलिसांसमोर जाहीर शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या प्रकरणावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पाटील म्हणाले, “लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ आणि समाजाचा आरसा आहे. आपण कधीही आरशाला दगड मारू नये. राजकारणात वादविवाद, मतभेद होत असतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिवीगाळ आणि मारण्याची भाषा करावी. संजय दीना पाटील हे आमचे बंधू आहेत, त्यांनी यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. चूक झाली असेल, तर पत्रकारांना ‘सॉरी’ म्हणायला काय हरकत आहे?”