Home महाराष्ट्र नाशिक Kalpana Kharat : कल्पना खरातची सर्वोच्च न्यायालयात धाव; एका गुन्ह्यात दिलासा, तर दुसऱ्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम

Kalpana Kharat : कल्पना खरातची सर्वोच्च न्यायालयात धाव; एका गुन्ह्यात दिलासा, तर दुसऱ्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम

0
Kalpana Kharat : कल्पना खरातची सर्वोच्च न्यायालयात धाव; एका गुन्ह्यात दिलासा, तर दुसऱ्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम

Kalpana Kharat : शिर्डी येथील भूखंड बळकावल्याच्या कथित प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भोंदू म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) दरवाजे ठोठावले आहेत. दरम्यान, सिन्नर (Sinnar) तालुक्यातील मिरगाव येथील १६.५० एकर जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्ह्यात नाशिकरोड (Nashik Road) येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे एका प्रकरणात न्यायालयीन दिलासा मिळाला असला तरी शिर्डी भूखंड प्रकरणातील निर्णयावर त्यांच्या अटकेचे भवितव्य अवलंबून आहे.

https://prahaar.in/2026/06/26/crime-15-year-old-boy-stabbed-over-parking-dispute-in-virar-incident-sparks-panic-in-the-area/

शिर्डी भूखंड प्रकरण भोवणार ?

शिर्डी येथील भूखंड बळकावल्याच्या आरोपांप्रकरणी कल्पना खरात (Kalpana Kharat) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने (High Court) यापूर्वी फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात त्या मागील तीन महिन्यांपासून पोलिसांच्या रडारवर असून, नाशिक ग्रामीण पोलिसांच्या शिर्डी पोलिस ठाण्याचे विशेष पथक त्यांचा शोध घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा न मिळाल्यास त्यांना पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/06/26/vaibhav-sooryvanshi-vaibhav-sooryvanshi-set-to-make-history-in-the-series-against-ireland-will-he-break-the-records-held-by-rohit-and-hardik/

मिरगाव प्रकरणात न्यायालयाचे निरीक्षण

दरम्यान, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील १६.५० एकर जमीन व्यवहार प्रकरणात शिवराम माळी यांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार जोगळेकर यांनी सुनावणी करताना अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद घेतली. न्यायालयाने नमूद केले की, संबंधित जमीन व्यवहार वर्ष २००४ मधील असून तक्रार तब्बल २२ वर्षांनंतर दाखल करण्यात आली आहे. एवढ्या दीर्घ कालावधीत व्यवहार रद्द करण्यासाठी, आर्थिक रक्कम परत मिळविण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी फिर्यादींकडून कोणतीही ठोस दिवाणी कार्यवाही करण्यात आलेली नाही.

https://prahaar.in/2026/06/26/nashikyouth-murdered-again-over-an-old-dispute/

तसेच हा व्यवहार नोंदणीकृत दस्तावेजाच्या माध्यमातून झालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान कल्पना खरात यांनी व्यवहारातील चर्चेत सहभाग घेतल्याचा, फिर्यादींना धमकावल्याचा किंवा फसवणुकीचा कट रचल्याचा ठोस पुरावा समोर आलेला नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने हा वाद प्रामुख्याने दिवाणी स्वरूपाचा असल्याचे मत व्यक्त केले आणि कल्पना खरात यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर हा दिलासा दिला आहे.

https://prahaar.in/2026/06/26/amarnath-yatra-2026-guide-dates-registration-routes-health-guidelines-and-more/

अशोक खरात तुरुंगातच

दरम्यान, अशोक खरात हे महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर स्वरूपाच्या सुमारे २० गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यानंतर १८ मार्चपासून कारागृहात आहेत. त्यामुळे कल्पना खरात यांना जमीन व्यवहार प्रकरणात दिलासा मिळाला असला तरी शिर्डी भूखंड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या तपास यंत्रणेसह सर्वांचे लक्ष त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील अर्जाच्या सुनावणीकडे लागले असून, त्या निर्णयानंतर पुढील कायदेशीर घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here