Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Rate Today : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी आनंदवार्ता; जळगावात दरांमध्ये मोठी घसरण

Gold Rate Today : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी आनंदवार्ता; जळगावात दरांमध्ये मोठी घसरण

0
Gold Rate Today : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी आनंदवार्ता; जळगावात दरांमध्ये मोठी घसरण

सोनं-चांदी (Gold Rate Today) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असलेल्या दरांमध्ये आज झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.

आज २४ कॅरेट सोन्याच्या एका तोळ्यामागे तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली असून एक तोळा सोन्याचा दर १ लाख ४० हजार रुपयांवर आला आहे. त्यामुळे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी आता १४ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात जवळपास १० हजार रुपयांची घसरण झाली आहे.

https://prahaar.in/2026/06/25/jalgaon-youth-dies-instantly-due-to-electric-shock/

चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून एका किलो चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा दर २ लाख २० हजार रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला. गेल्या आठ दिवसांत चांदी तब्बल २० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, आखाती देशांमधील तणाव कमी होण्याची चिन्हे आणि युद्धविरामाच्या चर्चांचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला असून त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे.

गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,७८० रुपयांची घसरण होऊन दर १,४०,१३० रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोनं २,५५० रुपयांनी स्वस्त होऊन १,२८,४५० रुपयांवर पोहोचलं आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर २,०८० रुपयांनी घसरून १,०५,१०० रुपयांवर आला आहे.

https://prahaar.in/2026/06/25/nashik-crime-panic-at-sinnar-bus-stand-as-man-brandishes-a-sickle/

दरम्यान, चांदीच्या दरातही १० हजार रुपयांची मोठी घसरण झाली असून चांदीचा भाव २,३५,००० रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदी खरेदीसाठी हा योग्य काळ ठरू शकतो, असा अंदाज बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here