Mirzapur The Movie Teaser : ‘मिर्झापूर’ चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा (Mirzapur The Movie) बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या क्राईम-ड्रामा विश्वाची आता मोठ्या पडद्यावर एंट्री होत असून, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
२०१८ मध्ये सुरू झालेल्या ‘मिर्झापूर’च्या प्रवासाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. आता या गाजलेल्या मालिकेची कथा चित्रपटाच्या माध्यमातून आणखी मोठ्या आणि भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
https://prahaar.in/2026/06/25/six-month-deadline-for-basic-amenities-in-state-schools-dr-pankaj-bhoyar/
टीझरमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू यांची दमदार झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, ‘बबलू पंडित’ची भूमिका साकारणारा दिव्येंदू पुन्हा एकदा या विश्वात परतताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता रवी किशन यांचीही दमदार उपस्थिती कथेला नवा आयाम देताना दिसते.
‘मिर्झापूर: द मुव्ही’ची कथा पूर्वांचलच्या गल्लीबोळांपासून राजस्थानच्या वाळवंटांपर्यंत विस्तारलेली दिसणार आहे. चित्रपटात अॅक्शन, सत्ता संघर्ष, सूड आणि राजकारणाचा तडका अधिक भव्य स्वरूपात पाहायला मिळणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते.
https://prahaar.in/2026/06/25/ahmedabad-airport-a-hair-raising-incident-at-ahmedabad-airport-air-india-and-indigo-aircraft-came-face-to-face-a-major-accident-was-averted/
View this post on Instagram
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मिर्झापूर: द मुव्ही’ हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू भाषेतही रिलीज केला जाणार आहे.
टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत असून, ‘मिर्झापूर’चे जग पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.