महाराष्ट्रातील मान्यवरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; पद्म पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. २४ : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार २०२६ प्रदान सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कला, वैद्यकशास्त्र, व्यापार-उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना यंदा पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातून ज्येष्ठ गायिका अल्का यागनीक (Alka Yagnik) यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
https://prahaar.in/2026/06/24/devotees-will-face-no-inconvenience-during-the-ashadhi-wari/
पद्म पुरस्कार हे विविध क्षेत्रांतील असामान्य कार्य, समर्पण आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करणारे प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान मानले जातात. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करताना देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
https://prahaar.in/2026/06/24/minister-shivendrasinhraje-bhosale-top-priority-for-road-safety-special-measures-for-accident-prone-routes-including-ambenali-ghat/
पद्मश्री पुरस्कार विजेते
सतीश शाह (Satish Shah) – कला (मरणोत्तर)
भिकल्या लाडक्या ढिंडा (Bhiklya Ladkya Dhinda)– कला
डॉ. आर्मिडा फर्नांडिस (Dr. Armida Fernandes)– वैद्यकशास्त्र
डॉ. अशोक खाडे (Dr. Ashok Khade) – व्यापार आणि उद्योग
माधवन रंगनाथन (Madhavan Ranganathan) – कला
रोहित शर्मा (Rohit Sharma)– क्रीडा
पद्म पुरस्कार हे विविध क्षेत्रांतील असामान्य कार्य, समर्पण आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करणारे प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान मानले जातात. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करताना देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मरणोत्तर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मान्यवरांना यावेळी विशेष अभिवादन करण्यात आले. त्यांचा वारसा आणि योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात आली.