Home महाराष्ट्र नाशिक Nashik Simhastha Kumbh Mela : गोदाघाट सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आठ ठिकाणी स्वतंत्र पथक; पोलिसांची राहणार करडी नजर

Nashik Simhastha Kumbh Mela : गोदाघाट सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आठ ठिकाणी स्वतंत्र पथक; पोलिसांची राहणार करडी नजर

0
Nashik Simhastha Kumbh Mela : गोदाघाट सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आठ ठिकाणी स्वतंत्र पथक; पोलिसांची राहणार करडी नजर

Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे आणि भाविक तसेच स्थानिक यांची सुरक्षा यादृष्टीने प्रशासनकडून पाऊले उचलली जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे वेगाने सुरु असतानाच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक शहर पोलिसांनी रामकुंड, गोदाघाट व परिसरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी व्यापक नियोजन केले आहे. भाविकांची वाढती गर्दी, धार्मिक कार्यक्रम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रत्येक घाटासाठी सुरक्षेचा भार आता परिक्षावधीन पोलिस उपनिरीक्षकांवर असेल.

महत्त्वाचे म्हणजे शहर आयुक्तालयात प्रशिक्षण पूर्ण करुन नव्यानेच रुजू झालेल्या आठ पोलिस उप निरीक्षकांपैकी सहा पोलिस उपनिरीक्षकांची नियुक्ती सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी या तीन पोलिस ठाण्यात आठ दिवसापूर्वीच केली होती. त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांवर असेल.

https://prahaar.in/2026/06/24/loc-news-pakistans-massive-military-buildup-along-the-loc-after-india-holds-back-indus-waters-35-anti-drone-units-deployed/

याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण घाट परिसराच्या बंदोबस्ताची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नूतन पोलिस उपनिरीक्षक प्रतिक राउत, कल्याणी नजन, सुनिल ठेंग, अशोक दिंडे, आदिनाथ कदम, अन्वर इमाम मुलाणी यांच्यावर गोदाघाट सुरक्षेची जबाबदारी असेल.

कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा भाग, पोलिसांना विस्तृत सूचना

कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पोलिसांना विस्तृत सूचना देण्यात आल्या आहेत. रामकुंड, गोदाघाट, प्रमुख मंदिरे, साधुग्रामकडे जाणारे मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त घालण्याचे निर्देश साडेसात आले आहेत. तसेच धार्मिक भावना भडकावणाऱ्या कृती, अफवा किंवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेशांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

https://prahaar.in/2026/06/24/nashik-jewelry-worth-%e2%82%b97-lakh-stolen/

पोलिसांची राहणार करडी नजर

१. रामकुंड परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात राहणार असून दिवसपाळीत नऊ तर रात्री पाच असे एकूण १४ अंमलदार कार्यरत राहतील.

२. प्रत्येक घाटावरील नियुक्त अधिकाऱ्यासोबत संबंधित पोलिस ठाण्यातील तीन अंमलदार आणि दोन ट्राफिक वॉर्डन नियुक्त करण्यात.

३. बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि ड्रोन निरीक्षणाच्या माध्यमातून संवेदनशील भागांवर सतत लक्ष ठेवले जाणार.

४. महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढविण्यासोबतच पाकीटमारी, चोरी, हरवलेली मुले, महिला छेडछाड, फसवणूक यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश.

५. वाहतूक विभागाशी समन्वय ठेवून संपूर्ण वाहतूक आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात

६. आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग राखून ठेवणे, नो-पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने हटविणे तसेच भाविकांना पार्किंग व शटल सेवांबाबत मार्गदर्शन करण्याची पोलिसांवर जबाबदारी

७. रामकुंड परिसरात प्रवेश व निर्गमन मार्ग स्वतंत्र ठेवणे, आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाचा वापर करणे, बॅरिकेडिंग व दिशादर्शक फलक कार्यान्वित ठेवणे तसेच चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सातत्याने गर्दीचे निरीक्षण करणे.

https://prahaar.in/2026/06/22/nashik-kumbh-mela-appointment-of-shrimant-ramkishordas-shastri/

‘या’ आठ ठिकाणी नियुक्ती

अहिल्याबाई होळकर पूल ते रामकुंड स्नान घाट, जुने भाजी पटांगण ते म्हसोबा पटांगण हा घाट परिसर, गौरी पटांगण ते टाळकुटेश्वर पूल, गांधी तलाव, देवमामलेदार ते निळकंठेश्वर घाट परिसर, कपुरथळा मैदान ते रोकडोबा घाट, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट

रामकुंड परिसर धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते. कुंभमेळ्यात गर्दीत वाढ होईल. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संयम, सतर्कता आणि तत्परता राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
संदीक कर्णिक, पोलिस आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here