नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने (Manika Batra) ‘टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया’ (टीटीएफआय) सोबतचा वाद अधिक तीव्र झाला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून तिला वगळण्याबाबत स्पष्ट आणि वस्तुस्थितीवर आधारित स्पष्टीकरण न मिळाल्यास टीटीएफआयवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बत्राने दिला आहे.
https://prahaar.in/2026/06/24/inclusion-of-poladpur-in-the-pocra-scheme-is-now-impossible-minister-ashish-jaiswals-reply-to-mla-pravin-darekars-question/
जर मला या निर्णयाच्या आधाराबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर माझ्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा, ज्यात माझ्या कायदेशीर टीममार्फत कायदेशीर मार्गाचा अवलंब करणेही समाविष्ट आहे, विचार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. म्हणूनच मी माननीय पंतप्रधान आणि माननीय क्रीडा मंत्री यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे,” असे मनिकाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.
https://prahaar.in/2026/06/24/dont-confuse-online-gaming-with-e-sports-maharashtra-government-to-soon-introduce-a-separate-policy/
हे काही मला संघात स्थान हवे आहे म्हणून नाही किंवा मला विशेष वागणूक हवी आहे म्हणूनही नाही. तर, निवड प्रक्रियेत पारदर्शकता, सुसंगतता आणि उत्तरदायित्व असणे प्रत्येक खेळाडूचा हक्क आहे, यावर माझा विश्वास आहे म्हणून मी हे करत आहे. मी जवळपास २० वर्ष अभिमानाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आज मी केवळ एका न्याय व प्रामाणिक स्पष्टीकरणाची मागणी करत असताना, मी केवळ प्रश्न विचारत आहे,विशेष सवलतीची मागणी करत नाहीये, माझ्या प्रश्नांचे उत्तर लवकरात- लवकर मिळावे.अशी भावना तिने व्यक्त केली आहे.निवड निकष पूर्ण न झाल्यामुळे महिलांच्या पाच सदस्यीय संघात स्थान न मिळालेल्या, जागतिक क्रमवारीत ५१ व्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूने सातत्याने हेच सांगितले आहे की, तिचा लढा हा निकालापेक्षा प्रक्रियेविरुद्ध आहे. तिला संघातून वगळण्याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी तिने टीटीएफआय,क्रीडा मंत्रालय,भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनाही पत्र लिहिले आहे.