मुंबईतील रेनवॉटर हार्वेस्टींग योजनेतंर्गत सर्व इमारती, संकुलांचे ऑडीट करा
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील (Mumbai) पाणी टंचाईच्या मुद्दयावरून पुन्हा सभागृहात वातावरण पेटले असून सध्या होणारा पाणी पुरवठा (Water supply) आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत ठोस भूमिकाच जाहीर करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. तसेच ज्या ज्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग तसेच कुपनलिका खोदण्याच्या नावाखाली एफएसआयचा लाभ घेतला आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळवले. त्या इमारती तसेच संकुलांमध्ये आजही या योजनांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे मागील दहा वर्षांतील अशा इमारतींचे ऑडीट करण्यात यावे तसेच विहिर बुजवणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभागृहात करण्यात आले.
मुंबई महापालिका सभागृहात सभागृहनेते गणेश खणकर यांनी निवेदन करून मुंबईतील पाणी टंचाईवर चिंता व्यक्त केली. यावेळी खणकर यांनी मुंबई शहरातील सर्व कुपनलिका अर्थात बोअरवेलचे सर्वंकष ऑडीट करण्यात यावे. तसेच कार्यरत बंद किंवा अनधिकृत कुपनलिका माहिती संकलित करून त्यांचा श्वाश्त वापर करण्यासाठी धोरण आखण्यात यावे तसेच पुरातन विहिरींची देखभाल करावी. मुंबईतील पाण्याचे स्त्रोत हे महापालिकेचे असले पाहिजे असले असे सांगत खणकर यांनी पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
https://prahaar.in/2026/06/23/fifa-world-cup-2026-missed-a-penalty-but-set-a-record-argentina-wins-with-two-goals-from-messi/
आज रस्त्यांचे सिमेंटीकरण होते, पण या रस्त्याशेजारील झाडे कापली गेली ती लावली सुध्दा नाही. तसेच त्यामुळे ती झाडे लावली गेली पाहिजे. तसेच इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात जी झाडे कापली गेली आहेत, त्या ठिकाणी झाडांचे पुनर्रोपण झाले का याचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली.
यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याचबाबतचे निवेदन मला करायचे होते. पण आता ते विरोधी पक्षनेत्यांनी केले आहे. मागील चार ते पाच वर्षांत विहिरी बुजवल्याचे सांगत या आलेल्या पाण्याच्या संकटाला महापालिका कशी सामोरे जाणार हे स्पष्ट करावे अशी विचारणा केली. तर अमेय घाेल यांनी आपल्या विभागात ४ ते ५ दिवस टँकर मिळत नसून भविष्यात नगरसेवकांच्या दारात पाण्याच्या तक्रारींसाठी लोक येतील अशी भीती व्यक्त केली. तर अश्रफ आझमी यांनी पाणी चोरी व गळतीचे प्रमाण कमी करावे अशी मागणी केली. तर यशवंत किल्लेदार यांनी पाणी कपात ही वेळेत आहे, पाण्यात आहे की दाबामध्ये आहे असा सवाल करत आज जुन्या इमारतींमधील रहिवाशांना तळ मजल्यावर येवू पाणी भरावे लागत असल्याचे सांगितले. तर विशाखा राऊत यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम हाती घेण्यात आल्यानंतर ती पूर्णत्वास येत असतानाही याचे पाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्या टाकल्या नाहीत, मग हे पाणी का टँकरने पुरवले जाणार आहे का सवाल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी पाऊस न आल्यास लगानसारखी परिस्थिती होईल अशी भीती व्यक्त केली.
विरेंद्र चौधरी यांनी दुषित पाण्याचा पुरवठा का होते याचे विभागातील कारणे देत सभागृहाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तर यशोधर फणसे यांनी वर्सोवा विभागात आता पाण्यावरून भांडणे व्हायला लागली असल्याचे सांगत प्रत्येक घरांमध्ये पंप लावले जावू लागले आहे. त्यामुळे महापौरांनी याबाबत संयुक्त बैठक घ्यावी अशी विनंती केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी पाण्याचा पुरवठा भविष्यातील उपाययोजना या संदर्भात सन २००९च्या धर्तीवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. तसेच आपल्याच पाईपलाईनमध्ये टँकरने पाणी चोरी होत असताना आम्ही जनतेला पाण्याची बचत करण्याचे आवाहन कसे करणार असा सवाल केला. ज्या विहिरी आहेत त्या आपण कशा ताब्यात घेवू शकतो याचा काही विचार केला आहे, किंवा त्यासाठी काय प्रयत्न केला जात आहे तेही सांगायला हवे,अशी विचारणा केली. स्वप्ना म्हात्रे, पावसाचे पाणी धो धो वाहते ते गटारातून समुदात वाहून जाते आणि आपण ते पाहतो फक्त, त्यामुळे आपल्यासारखे आपणच कमनशिबी आहोत असे सांगितले. कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार प्रशासन करणार आहे का अशी विचारणा यामिनी जाधव यांनी केली. आपण शुध्द पाणी पुरवत असताना त्यांचा वापर योग्य व्हायला हवा, यासाठी प्रत्येक नगरसेवकाला जलशुध्दीकरण केंद्र दाखवावे अशी सूचना श्रध्दा जाधव यांनी केली. बोअरवेल खोदकामाच्या परवानगी महापालिकेच्या वतीने देण्यात याव्यात अशी सूचना सचिन पडवळ यांनी केली.
https://prahaar.in/2026/06/22/i-left-the-party-due-to-harassment-by-one-individual-mp-sanjay-dina-patil-alleges/
यावेळी झालेल्या चर्चेत रिटा मकवाना, अजित रावराणे, प्रकाश गंगाधरे, सिध्दार्थ शर्मा, आयेशा वणू, संगीता शर्मा, प्रकाश दरेकर, वर्षा टेंबवलकर,आशा मराठे, हेतल गाला, हेमांगी वरळीकर आदींनी चर्चेत भाग घेतला.