सासऱ्याने सुनेच्या अंगावर घातली कार
Father Attacks Son : अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा (Tiwsa) शहरात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका वडिलांनी आपल्या मुलगा आणि सुनेच्या अंगावर कार घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत सून गंभीर जखमी झाली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.