Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सादर झाला शोकप्रस्ताव

Maharashtra Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सादर झाला शोकप्रस्ताव

0
Maharashtra Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सादर झाला शोकप्रस्ताव
vidhanbhavan

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून म्हणजेच सोमवार २२ जूनपासून सुरुवात झाली असून १० जुलैपर्यंत ते चालणार आहे. ऑपरेशन टायगरच्‍या पार्श्वभूमीवर होणार्‍या या अधिवेशनात पावसाने मारलेल्या दडीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळाचे सावट असेल. (Maharashtra Monsoon Session 2026)

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. या शोकप्रस्तावात पद्मविभूषण आशा भोसले; पद्मभूषण सुमन कल्याणपूर; माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी आमदार विठ्ठलराव लक्ष्मणराव धोटे, बळीराम कडुजी कोटकर-पाटील, कृष्णराव नानासाहेब देशमुख, पटल्या लंगडा मावसकर, वसंतराव दोधा सुर्यवंशी, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया, उषादेवी कृष्णराव जगदाळे आज शकुंतला नंदकिशोर शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (Maharashtra Monsoon Session 2026)

https://prahaar.in/2026/06/22/legislative-council-election-2026-mahayuti-triumphs-in-10-out-of-11-legislative-council-seats/

या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांची मोठी रक्कम, कर्जमाफीबद्दलची नाराजी, लाडकी बहीण योजनेतील गळलेली नावे, कंत्राटदारांची थकीत देयके याबरोबरच ऑपरेशन टायगरचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. महिला शेतकऱ्यांना अधिकार देणारे विधेयक तसेच पुरवणी मागण्यांना मान्यता हे अधिवेशनासमोरचे सर्वात महत्त्वाचे सहकारी कामकाज असेल. (Maharashtra Monsoon Session 2026)

या तीन आठवड्यांच्या अधिवेशनात सरकारकडून एकूण १० विधेयके मांडली जातील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here