Home क्रीडा Team India Squad Announcement : इंग्लंड दौऱ्यत विराट कोहलीचे पुनरागमन ? बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा !

Team India Squad Announcement : इंग्लंड दौऱ्यत विराट कोहलीचे पुनरागमन ? बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा !

0
Team India Squad Announcement : इंग्लंड दौऱ्यत विराट कोहलीचे पुनरागमन ? बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा !

Mumbai : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात १४ जुलै ते १६ जुलै २०२६ या कालावधीत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी स्टार फलंदाज शुभमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यास विराट कोहलीचाही संघात समावेश होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

विराट कोहलीचे पुनरागमन ?

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने त्याला अफगाणिस्तानविरुद्धची मालिका गमवावी लागली आहे. इंग्लंड दौऱ्यात सहभागी होण्यापूर्वी त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी द्यावी लागेल. स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांचीही संघात पुन्हा निवड झाली आहे.

https://prahaar.in/2026/06/21/wife-swapping-racket-exposed-in-surat/

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

शुभमन गिल(कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली* श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक) ईशान किशन(यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह , प्रसिद्ध कृष्णा , हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार. (* फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यास विराट कोहलीचाही संघात समावेश होणार)

https://prahaar.in/2026/06/21/vaibhav-sooryvanshi-vaibhav-sooryvanshi-takes-the-final-by-storm-sets-a-new-record-in-just-11-balls/

इंग्लंड-भारत मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक :

पहिली वनडे : 14 जुलै (दुपारी 3:30 वाजता, एजबॅस्टन, बर्मिंघम)

दुसरी वनडे : 16 जुलै (संध्याकाळी 5:30 वाजता, सोफिया गार्डन्स, कार्डिफ)

तिसरी वनडे : 19 जुलै (दुपारी 3:30 वाजता, लॉर्ड्स, लंडन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here