‘लँड जिहाद’बाबत मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या पत्रानंतर कारवाई; ओशिवरा सोसायटीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
ज्येष्ठ नागरिक, महिलांना धमकावून जागा रिकामी करण्याचा प्रयत्न; मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि छेडछाडीच्या तक्रारी
हा नवा वर्सोवा पॅटर्न; शहराचा रंग बदलण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू – आमदार अमीत साटम
मुंबई : ओशिवरा परिसरातील ‘लँड जिहाद’प्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष तथा अंधेरी पश्चिमचे आमदार अमीत साटम यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनंतर शनिवारी मुंबई पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांनी संयुक्त कारवाई करत विजय विशाल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील अनधिकृत बांधकामे पाडून अतिक्रमणे हटवली.
https://prahaar.in/2026/06/20/nashik-illegal-transport-of-cattle/
१३ जून रोजी आमदार अमीत साटम यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आणि बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून संबंधित गृहनिर्माण संस्थेतील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.संस्थेतील रहिवाशांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा उल्लेख करत साटम यांनी सांगितले की, रहिवाशांच्या मते स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या गुन्हेगारांना पाठबळ दिले जात आहे. हा नव्या ‘वर्सोवा पॅटर्न’चा भाग असून परिसराची लोकसंख्यात्मक रचना बदलण्याचा, खासगी जमिनींवर कब्जा करण्याचा आणि रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहराचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे साटम म्हणाले.
https://prahaar.in/2026/06/20/union-home-minister-amit-shah-visits-the-ambabai-temple-development-works-worth-%e2%82%b91445-crore-launched-in-the-presence-of-the-chief-minister-and-amit-shah/
साटम यांनी पत्रात नमूद केले की, संस्थेकडे हस्तांतरण करार (Conveyance Deed), इंडेक्स-२ आणि मालमत्ता कराच्या पावत्या यांसारखी मालकीची कागदपत्रे असतानाही संस्थेच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना धमकावले जात असल्याच्याही तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.युनूस रेहमान शेख नावाच्या व्यक्तीने संस्थेच्या आवारातील सीटीएस क्रमांक १३७ या मोकळ्या भूखंडावर न्यायालय आणि महसूल विभागाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण केल्याचा आरोपही साटम यांनी केला. तसेच इमारत क्रमांक ३ मध्ये घुसखोरी होत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली असून, परिसरात शेळ्या, कुत्री आणि बदके पाळली जात असल्याने सुरक्षितता व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.संस्थेबाहेरील परिसरात मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि महिलांची छेडछाड यांसारख्या प्रकारांना ऊत आला असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार रहिवाशांनी केल्याचेही साटम यांनी नमूद केले.