Home ब्रेकिंग न्यूज FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg : प्राजक्ता माळीने उद्घाटन केलेल्या मॉलवर ४८ तासांतच FDAची धाड! मॉलमध्ये असं नेमकं काय सापडलं?

FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg : प्राजक्ता माळीने उद्घाटन केलेल्या मॉलवर ४८ तासांतच FDAची धाड! मॉलमध्ये असं नेमकं काय सापडलं?

0
FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg : प्राजक्ता माळीने उद्घाटन केलेल्या मॉलवर ४८ तासांतच FDAची धाड! मॉलमध्ये असं नेमकं काय सापडलं?
Aapla Bazaar

सिंधुदुर्ग : अवघ्या दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ मॉलवर शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने अचानक धाड टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. उद्घाटनाची चर्चा सुरू असतानाच सरकारी यंत्रणेच्या या कारवाईमुळे मॉल आणि प्रशासनाच्या हालचालींबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg)

राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा धडाका लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोकणातील विविध ठिकाणी तपासण्या सुरू असून कुडाळमधील ही कारवाई विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. (FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg)

ग्राहकांना बाहेर काढून चौकशीला सुरुवात :

मिळालेल्या माहितीनुसार, FDAचे पथक शुक्रवारी अचानक ‘आपला बाजार’ मॉलमध्ये दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना बाहेर जाण्यास सांगितले आणि त्यानंतर मॉलचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून तपासणी मोहीम सुरू केली. पथकाकडून अन्नपदार्थांचे परवाने, साठा, उत्पादनांची गुणवत्ता, लेबलिंग तसेच इतर कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मॉलमधील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg)

 

उद्घाटनानंतर लगेच कारवाई; चर्चांना उधाण :

बुधवार १७ जून रोजी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या उपस्थितीत या मॉलचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले होते. मात्र अवघ्या ४८ तासांतच FDAच्या पथकाने धाड टाकल्याने स्थानिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. मॉलवर नेमकी कोणत्या कारणामुळे तपासणी करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि मॉलबाहेर नागरिकांची गर्दी झाली. (FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg)

नागरिकांची तपासणीची मागणी :

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक भागांत उघड्यावर चालणाऱ्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवरही FDAने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची सर्वसमावेशक तपासणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, ‘आपला बाजार’ मॉलवरील तपासणीचा अंतिम अहवाल आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या कारवाईमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र या धाडीची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगली आहे. (FDA Raid ‘Aapla Bazaar’ in Sindhudurg)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here