‘ऑपरेशन टायगर’वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया
मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, सत्ताधारी शिवसेनेतर्फे यावर पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेवर त्यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. “दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल”, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
https://prahaar.in/2026/06/19/transport-minister-pratap-sarnaik-appeals-to-best-employees-to-call-off-the-strike-to-spare-mumbaikars-from-hardship/
या बंडखोर खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा नेमका कधी आणि कुठे होणार, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असतानाच, शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात आणखी काहीतरी मोठी घडामोड घडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.खासदार फुटीनंतर उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्ष सोडणाऱ्यांना भरचौकात ‘तुडवा’ असे विधान केले आहे. त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “जे लोक जास्त ओरडतात, ते प्रत्यक्षात काहीही करू शकत नाहीत. ‘जो गरजते है, वो बरसते नही’, ही त्यांची अवस्था आहे,” अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्या इशाऱ्याची हवा काढून घेतली.
https://prahaar.in/2026/06/19/minister-dadaji-bhuse-agreement-between-the-school-education-department-and-google-for-artificial-intelligence-training/
विरोधक जेवढे आरोप करतील, तितका आमचाच फायदा!
या बंडखोरीच्या मागे सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची मोठी आर्थिक रसद पुरवल्याचा गंभीर आरोप उबाठा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. या आरोपांवर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “विरोधी पक्षातील नेत्यांना आता आरोप करण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. ते आमच्यावर जेवढे जास्त आरोप करतील, ते जेवढे जास्त बेताल बोलतील, तितका राजकीयदृष्ट्या आमचा आणि आमच्या शिवसेनेचाच फायदा होणार आहे.”