मुंबई : रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या (Central Government) महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (Pradhan Mantri Vishkar Bharat Rojgar Yojana) अंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) १९ जून रोजी प्रोत्साहन वितरण समारंभ आयोजित करणार आहे. या योजनेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नवी दिल्लीतील (New Delhi) विज्ञान भवन येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पीएमव्हीबीआरवाय अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सुमारे २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित करण्यात येणार आहे.
https://prahaar.in/2026/06/19/india-france-ties-further-strengthened-pm-modi-makes-a-major-statement-in-paris/
याशिवाय, योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी देशातील प्रमुख औद्योगिक आणि रोजगार केंद्रांमध्ये सुमारे २०० समांतर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. तसेच नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरणही करण्यात येईल. मुंबईत वांद्रे येथील EPFO कार्यालयात तर नागपूरमध्ये नंदनवन येथील केडीके कॉलेज रोडवरील ईपीएफओ प्रादेशिक कार्यालयात लाभ वितरणाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. (Mumbai)
https://prahaar.in/2026/06/19/deputy-chief-minister-eknath-shindes-political-strength-set-to-increase-number-of-shiv-sena-mps-to-rise-from-7-to-13/
पीएमव्हीबीआरवाय योजनेचे उद्दिष्ट देशभरात ३.५ कोटींहून अधिक रोजगारनिर्मिती करणे आहे. प्रथमच नोकरी करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. या उपक्रमामुळे औपचारिक रोजगाराला चालना मिळून दीर्घकालीन आर्थिक विकासाला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Pradhan Mantri Vishkar Bharat Rojgar Yojana)