Home महाराष्ट्र नाशिक Nashik : शनिवारी शहरातील ‘या’ भागांचा वीजपुरवठा बंद, विद्युत वाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची कामे हाती

Nashik : शनिवारी शहरातील ‘या’ भागांचा वीजपुरवठा बंद, विद्युत वाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची कामे हाती

0
Nashik : शनिवारी शहरातील ‘या’ भागांचा वीजपुरवठा बंद, विद्युत वाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची कामे हाती

Nashik : महावितरणकडून विद्युत वाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. २०) शहरातील जेलरोड आणि कॉलेज रोड परिसरात काही तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. नाशिक शहर मधील विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार २० जून रोजी जेलरोड कक्ष अंतर्गत असलेल्या ३३/११ पंचक उपकेंद्रातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही राहुल नगर व सायट्रिक विद्युत वाहिन्या सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तसेच ३३ केव्ही गंगापूर विद्युत वाहिनीचा पुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

वीजपुरवठा कुठे बंद राहणार ?

महावितरणच्या माहितीनुसार, जेलरोड कक्षांतर्गत असलेल्या ३३/११ केव्ही पंचक उपकेंद्रातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही राहुलनगर आणि सायट्रिक या विद्युत वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ३३ केव्ही गंगापूर विद्युत वाहिनीचा पुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत खंडित करण्यात येणार आहे.

https://prahaar.in/2026/06/19/nashik-crime/

राहुलनगर वाहिनीअंतर्गत राहुलनगर, दामोदरनगर, केरू पाटीलनगर, सिद्धाईनगर, मोरे मळा, पवारवाडी, भैरवनाथनगर, भारत भूषण, वाघेश्वरी, विमलनगर, प्रगतीनगर, ब्रीजनगर आदी भागांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.

सायट्रिक वाहिनीअंतर्गत एकदंत अपार्टमेंट, द्वारकानगर, एकतानगर, हरिकूलनगर, संभाजीनगर, सद्गुरूनगर, अयोध्यानगर, गुरूअमृतनगर, शनिमंदिर परिसर, सरस्वतीनगर, श्रीकृष्णनगर व परिसरातील ग्राहकांना वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

https://prahaar.in/2026/06/19/transport-department-action-to-be-taken-against-non-marathi-speaking-auto-rickshaw-and-taxi-drivers-after-august-15-if-they-lack-a-marathi-language-certificate/

तर गंगापूर विद्युत वाहिनीअंतर्गत कॉलेज रोड, शिर्केमळा, बीवायके कॉलेज परिसर, कृषीनगर, सायकल सर्कल परिसर, पारिजातनगर, पी अँड टी कॉलनी, कॅनडा कॉर्नर आणि आसपासच्या भागांवर परिणाम होणार आहे.

देखभाल व दुरुस्तीची कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ आणि २ तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here