https://prahaar.in/2026/06/18/8th-pay-commission/
एसएनबीच्या आकडेवारीनुसार, वित्तीय संस्थांमार्फत ठेवण्यात आलेल्या निधीत सर्वाधिक घट झाली आहे. या श्रेणीतील रक्कम १५ टक्क्यांनी घटून २.६ अब्ज स्विस फ्रँक इतकी राहिली. त्यामुळे स्विस बँकांमधील भारतीयांच्या एकूण निध्यात घट झाल्याचे दिसून येते. याउलट, ग्राहकांच्या थेट बँक खात्यांमधील ठेवींची वाढ ही वैध आर्थिक व्यवहार आणि पारदर्शक बँकिंग पद्धतीकडे वाढलेल्या कलाचे संकेत मानले जात आहेत. २०२५ मध्ये या खात्यांतील ठेवी सुमारे २० टक्क्यांनी वाढून ८९.७३ दशलक्ष डॉलर (सुमारे ७८० कोटी रुपये) झाल्याचीही नोंद आहे.
https://prahaar.in/2026/06/17/bse-launch-indias-first-satvik-index-for-values-based-investing-launched/
स्विस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, स्विस बँकांमध्ये जमा असलेली प्रत्येक भारतीयांची रक्कम ही काळा पैसा असल्याचे मानता येत नाही. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात २०१८ पासून ‘ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ (AEOI) करार लागू आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश संशयास्पद खात्यांची माहिती दरवर्षी एकमेकांशी शेअर करतात. त्यामुळे करचुकवेगिरी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे. स्विस बँकांमध्ये परदेशी ग्राहकांच्या निधीच्या बाबतीत ब्रिटन प्रथम, तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने यंदा दोन स्थानांची सुधारणा करत ४६वे स्थान मिळवले आहे.