Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Silver Rate Today : संधी चुकवू नका ! सोने 6000 तर चांदी 23 हजारांनी घसरली; सोने चांदीचे आजचे दर काय ?

Gold Silver Rate Today : संधी चुकवू नका ! सोने 6000 तर चांदी 23 हजारांनी घसरली; सोने चांदीचे आजचे दर काय ?

0
Gold Silver Rate Today : संधी चुकवू नका ! सोने 6000 तर चांदी 23 हजारांनी घसरली; सोने चांदीचे आजचे दर काय ?
gold - silver rate

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच सोने खरेदी करून इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अधिक मास संपल्यानंतर पुन्हा लग्नसराई सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांच्या खरेदीसाठी इतके दिवस थांबून असलेल्या ग्राहकांना यामुळे दिलासा मिळू शकतो.

https://prahaar.in/2026/06/18/income-tax-return-major-changes-made-to-income-tax-forms/

सोने चांदीचे आजचे दर काय ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ६१८ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५४,५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर गुरुवारी आणखी ११३३ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,३६७ रुपयांपर्यंत घसरले होते. तर आज शुक्रवारी पुन्हा ४३२६ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,०४१ रुपयांपर्यंत स्वस्त झाले. सोन्याच्या दरात गेल्या चार दिवसांत तब्बल ६१८० रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेतली गेली.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी १०३० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,५९,५६० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर गुरुवारी आणखी ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,५४,४१० रुपयांपर्यंत घसरली होती. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा १४,४२० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३९,९९० रुपयांपर्यंत स्वस्त झाली. चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांत तब्बल २३,६९० रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेतली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here