Home महाराष्ट्र नाशिक Nashik Simhastha Kumbh Mela : पंचवटी परिसरातील १०० वर्षे जुनी ‘गोयंका धर्मशाळा’ जमीनदोस्त, सिंहस्थासाठी मनपाची मोठी कारवाई

Nashik Simhastha Kumbh Mela : पंचवटी परिसरातील १०० वर्षे जुनी ‘गोयंका धर्मशाळा’ जमीनदोस्त, सिंहस्थासाठी मनपाची मोठी कारवाई

0
Nashik Simhastha Kumbh Mela : पंचवटी परिसरातील १०० वर्षे जुनी ‘गोयंका धर्मशाळा’ जमीनदोस्त, सिंहस्थासाठी मनपाची मोठी कारवाई

Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर नाशिकमध्ये विकासकामांचा धडाका सुरु आहे. सिंहस्थ कुंभमेळा आणि ‘राम काल पथ’ विकास आराखड्यांतर्गत गंगाघाट व रामकुंड परिसराचा कायापालट करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र केली आहे. विविध विकासकामांमध्ये आणखी भर पडणार आहे.

सिंहस्थाच्या विकासासाठी म्हणून, अनेक सिंहस्थ कुंभमेळ्यांची साक्षीदार राहिलेली आणि कपालेश्वर मंदिराजवळ असलेली सुमारे १०० वर्षे जुनी ‘गोयंका धर्मशाळा’ इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून या पाडकामास सुरुवात करण्यात आली.

https://prahaar.in/2026/06/19/nashik-crime/

महापालिका नव्याने गाळे बांधून देणार

महापालिकेने विकासासाठी ही जागा ताब्यात घेतली आहे. सोबतच येथील १३ व्यावसायिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येथील अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या १३ व्यावसायिकांना महापालिका नव्याने गाळे बांधून देणार आहे. प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनानंतर व्यावसायिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःहून आपले गाळे रिकामे केले आणि शटर काढून घेतले. त्यामुळे या ठिकाणी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली नाही.

व्यावसायिकांनी सहकार्य केल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रथम हाताने निघणारे साहित्य व पत्रे बाजूला केले. त्यानंतर रात्री उशिरा जेसीबीच्या साहाय्याने मुख्य पाडकामाला सुरुवात झाली. रस्त्यालगत काम सुरू असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

https://prahaar.in/2026/06/19/minister-zirwal-also-steps-in-to-curb-adulteration/

रामकुंड परिसराच्या सुशोभीकरणाला वेग

स्मार्ट सिटी तसेच महापालिका प्रशासनामार्फत रामकुंड परिसरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती हटवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रशासनाने पांडे मिठाईचे शॉप, वस्त्रांतरगृह, वैष्णव रोड, वाचनालय रोडचे बांधकाम हटवले आहे. त्यानंतर आता गोयंका धर्मशाळेची पुढील बाजू पाडण्यात आली आहे. तर मागील बाजूचे उर्वरित बांधकाम हटवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ही धर्मशाळा साधारणपणे १०० वर्षापूर्वी उभारण्यात आली होती. या कारवाईमुळे आता परिसरातील रस्ते रुंद होणार असून आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मोठी सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here