Home ब्रेकिंग न्यूज Navnath Ban : बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेसला विकल्यानेच ‘उबाठा’चे अधःपतन

Navnath Ban : बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेसला विकल्यानेच ‘उबाठा’चे अधःपतन

0
Navnath Ban : बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेसला विकल्यानेच ‘उबाठा’चे अधःपतन
navnath ban

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आहे असे म्हणणारे संजय राऊतच त्या गोलपिठावर बसून आहेत. तुमचे आजचे ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर भाषण करण्यासारखे आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून आता तुम्ही लोकांना शहाणपण शिकवत आहात. आपले विचार काँग्रेसला विकलेल्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अधःपतनावर भाष्य करू नये. दलाली करण्याची आणि सत्तेसाठी विचार विकण्याची सुरुवात महाराष्ट्रात 2019 मध्ये उबाठा गटाने केल्याने तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या पक्षप्रमुखांचे राजकीय अधःपतन झाले, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Pakistan Take Action In Bay of Bengal)

https://prahaar.in/2026/06/18/pakistan-takes-action-in-the-bay-of-bengal-pakistan-prepares-for-a-comeback-in-the-bay-of-bengal-after-55-years-with-chinas-help-will-indias-concerns-mount/

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत, तोडफोडीची भाषा तुम्ही करू नका. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याला सोडले जाणार नाही. 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना आपली असल्याचे सांगितले होते त्यावेळीही संजय राऊत यांनी तोडफोड, मारपीट आणि धमक्यांचीच भाषा वापरली होती. आजही तुम्ही कितीही आव्हाने द्या, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कुणीही कायदा हातात घेतला, तर त्याला कायद्यानुसार चोख उत्तर दिले जाईल.

https://prahaar.in/2026/06/18/horrific-accident-on-mumbai-nashik-highway-woman-on-two-wheeler-dies/

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, ‘माझा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापेक्षा मी माझे दुकान बंद करेन.’ संजय राऊत वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे विचार तुम्ही आत्मसात करणार आहात का? बाळासाहेबांचे हिंदुत्व तुम्ही स्वीकारणार आहात का? तुम्ही आज राहुल गांधी यांच्यासोबत बसता, सोनिया गांधीं यांचे लुगडे धूत आहात. हे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या विचारांत किंवा शिवसेनेच्या भूमिकेत कधीच सांगितले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोयीप्रमाणे वापरू नका. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘विचारांशी प्रतारणा करणाऱ्याला जोडे फोडा.’ तोच न्याय लावायचा असेल, तर सर्वाधिक प्रश्न संजय राऊत आणि उबाठा गटाला विचारले पाहिजेत, असेही श्री. बन म्हणाले.

https://prahaar.in/2026/06/18/identity-of-unclaimed-body-found-in-that-suitcase-established/

संजय राऊत, काँग्रेसकडे सत्तेसाठी जात असताना तुम्ही नेमके किती पैसे घेतले होते? राहुल गांधींकडून किती कोटी रुपये घेतले होते ? महाराष्ट्रात काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी किती हजार कोटी रुपयांची डील केली होती? याचे उत्तर एकदा महाराष्ट्राला दिले पाहिजे. तुम्हाला ते देता येणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की बेइमानी करणाऱ्यांना याची उत्तरे देता येत नाहीत. कोविड काळात तुम्ही करोडो रुपयांचे घोटाळे केले. सर्वाधिक घोटाळेबाज मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर रेकॉर्ड आहे. त्यामुळे पैशावर माणसे खरेदी करता आली असती तर उद्धवजी ठाकरे या देशाचे पंतप्रधान झाले असते. संजय राऊतांकडे एवढा पैसा आहे की संजय राऊत देशाचे गृहमंत्री झाले असते, असेही श्री. बन यांनी सुनावले.एक ऑपरेशन यशस्वी झाले की दुसरे ऑपरेशन आपोआपच होते. मागच्या वेळेला, म्हणजे 2022 मध्ये एक ऑपरेशन यशस्वी झाले. त्यानंतर आता हे दुसरे ऑपरेशन यशस्वी झाले, की तिसरे ऑपरेशन होतच असते. उबाठा गटाकडे चार लोक आहेत. उद्या ते ही शिल्लक राहतील का, याचा विचार करावा आणि ही सगळी वेळ संजय राऊतांमुळे आली आहे, हेही उबाठा गटाने आणि उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे, असे बन म्हणाले.(Pakistan Take Action In Bay of Bengal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here