Home ताज्या घडामोडी Nashik unauthorized encroachment : सारडा सर्कलनंतर आता भद्रकाली, दूध बाजार आणि फाळके रोड परिसर प्रशासनाच्या रडारवर

Nashik unauthorized encroachment : सारडा सर्कलनंतर आता भद्रकाली, दूध बाजार आणि फाळके रोड परिसर प्रशासनाच्या रडारवर

0
Nashik unauthorized encroachment : सारडा सर्कलनंतर आता भद्रकाली, दूध बाजार आणि फाळके रोड परिसर प्रशासनाच्या रडारवर

Nashik unauthorized encroachment : नाशिक शहरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली असून शुक्रवार (दि. १९) पासून व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात फाळके रोड, दूध बाजार आणि भद्रकाली परिसरातून होणार असून जेसीबीच्या सहाय्याने नियमबाह्य बांधकामे व अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.

या कारवाईसाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त मंजूर झाला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या उपस्थितीत मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

https://prahaar.in/2026/06/18/nashik-crime-22-year-old-married-woman-commits-suicide/

विशेष म्हणजे, भद्रकाली परिसरातील २२ मोठ्या व्यावसायिक आस्थापनांना आणि दुकानदारांना महापालिकेकडून अंतिम नोटीस देण्यात आली आहे. नोटीसची मुदत संपल्यानंतर संबंधित अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी सारडा सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर आता महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या व्यावसायिक भागांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘शहरातील प्रमुख आणि गर्दीच्या भागांमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्व संबंधितांना कायदेशीर नोटिसा देण्यात आल्या असून नियमबाह्य अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत,’ अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here