Home क्रीडा IPL 2027 : आयपीएल २०२७ लवकर सुरू होणार ? बीसीसआयने दिली मोठी अपडेट; ७४ नाही तर ९४ सामने होणार ?

IPL 2027 : आयपीएल २०२७ लवकर सुरू होणार ? बीसीसआयने दिली मोठी अपडेट; ७४ नाही तर ९४ सामने होणार ?

0
IPL 2027 : आयपीएल २०२७ लवकर सुरू होणार ? बीसीसआयने दिली मोठी अपडेट; ७४ नाही तर ९४ सामने होणार ?

मुंबई : आयपीएल २०२६ हंगाम संपून एक महिन्यापेक्षा कमी काळ लोटला आहे.आता,बीसीसीआयने पुढील हंगामाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२७ चा हंगाम या हंगामापेक्षा थोडा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा २० वा हंगाम १० मार्च २०२७ रोजी सुरू होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. हा बदल भारतातील मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे करण्यात आला आहे, ज्यामुळे खेळाडूंना दुखापतीही होतात. असं बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.(FIFA World Cup 2026 England vs Croatia )

https://prahaar.in/2026/06/18/portugal-vs-dr-congo-match-ends-in-a-draw-its-not-over-yet-ronaldos-first-reaction-following-the-draw-is-becoming-a-talking-point/

आयपीएल २०२७ लवकर सुरू होणार ?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मे महिन्यात देशात येणारी तीव्र उष्णतेची लाट टाळण्यासाठी आयपीएल २०२७ हंगाम लवकर सुरू करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयने पुढील हंगाम १० मार्च ते १५ मे दरम्यान आयोजित करण्याची योजना आखली आहे. खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी ही स्पर्धा १० मार्च ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. १५ मे नंतर देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णता वाढू लागते. त्यामुळे, पुढील वर्षी ही स्पर्धा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. परंपरेनुसार, आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालते. सैकीया यांनी नमूद केले की, आयपीएल लवकर सुरू केल्याने खेळाडू आणि प्रेक्षक दोघांनाही फायदा होईल.(FIFA World Cup 2026 England vs Croatia )

https://prahaar.in/2026/06/18/health-minister-prakash-abitkar-patients-under-the-mahatma-phule-and-ayushman-bharat-schemes-to-receive-a-welcome-kit/

५४ च्या जागी ७४ सामने खेळले जाणार ?

आयपीएल २०२७ मध्ये सामन्यांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, याबाबत बीसीसआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आयपीएल २०२६ मध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार नाही , असं स्पष्ट सांगीतले आहे. ते म्हणाले, आपीएलसाठी दोन महिन्यांचा कालावधी असून तो आणखी वाढवले जाणार नाही, कारण इतर देशांनाही द्विपक्षीय सामने खेळायचे आहेत. यामुळे सामन्यांची संख्या ७४ वरून ९५ पर्यंत वाढवण्याबाबत सध्या कोणतीच चर्चा होत नाही आहे. स्पर्धा दोन आठवडे आधी सुरू करण्याचा विचार आहे, मार्च महिन्याच्या अखेरच्या ऐवजी स्पर्धा थोडी लवकर सुरू करता येईल का, यावर बीसीसीआय तसेच आमच्या आयपीएल नियामक परिषदेमध्ये चर्चा सुरू आहे,असे बोर्ड सचिवांनी सांगितले.(FIFA World Cup 2026 England vs Croatia )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here