Home ब्रेकिंग न्यूज Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

0
Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती
Vijay Singhal

– राज्य शासनाकडून १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी (१६ जून) बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात, सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, तर, दिपेंद्र सिंह कुशवाह यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पद अश्विनी जोशी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदावर वर्णी लागली आहे. (Dharavi Redevelopment Vijay Singhal)

धारावी पुनर्वसन प्रकल्पात विजय सिंघल यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. तर, त्यांच्या जागी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर सध्या एमएमआरडीच्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची सचिव (वने), महसूल व वन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. (Dharavi Redevelopment Vijay Singhal)

https://prahaar.in/2026/06/17/shiv-sena-ubt-another-split-in-ubt-six-mps-join-shindes-camp/

डॉ. कादंबरी बलकवडे यांची उद्योग संचालनालयात विकास आयु्क्त (उद्योग) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील संजय काटकर यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्त (कुटुंब कल्याण) पदी नियुक्ती झाली आहे. तर केंद्रिय प्रतिनियुक्तीवरुन राज्य सरकारकडे रूजू झालेल्या प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Dharavi Redevelopment Vijay Singhal)

https://prahaar.in/2026/06/17/bmc-app-road-issue-can-be-done-on-app/

यासोबतच, किनवट प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्रा दोनथुला यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. तर, अनय नावंदर, प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा यांची बदली अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय, जालन्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांची किनवट प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, लघिमा तिवारी यांची तळोदा सहाय्यक जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. (Dharavi Redevelopment Vijay Singhal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here