Home ब्रेकिंग न्यूज Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

0
Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या आदेशाला अवघ्या एका दिवसात स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेल्या प्राजक्ता लवंगारे वर्मा यांच्या नियुक्तीलाही शासनाने स्थगिती दिली असून दोन्ही आदेश पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/06/17/arjun-meghe-publicly-joins-the-nationalist-congress-party-ap/

डॉ. अश्विनी जोशी यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी करण्यात आली होती. त्यांच्या रिक्त पदावर प्राजक्ता लवंगारे वर्मा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार वर्मा या गुरुवारी पदभार स्वीकारणार होत्या. मात्र, बुधवारी डॉ. जोशी यांनी महापालिकेच्या सभेसह नियमित कामकाजात सहभाग घेतला असतानाच दुपारी शासनाकडून दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदली व नियुक्ती आदेशांना स्थगिती देण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले.

https://prahaar.in/2026/06/17/the-lok-sabha-earthquake-has-also-sparked-unease-among-corporators/

निवडणुकीशी संबंधित कामकाजामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा असली तरी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे स्थगितीच्या निर्णयानंतर विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत डॉ. जोशी याच अतिरिक्त आयुक्तपदाचा कारभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here