कॅनडा : मंगळवार, १६ जून रोजी, कॅनडातील टोरोंटो स्टेडियमवर नेदरलँड्स आणि कॅनडा यांच्यात एकदिवसीय सामना खेळला गेला. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ २५ चेंडूंनंतर सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाला तेव्हा, ४.१ षटकांत नेदरलँड्सच्या धावसंख्येवर १ गडी बाद १५ धावा झाल्या होत्या.नेदरलँड्सकडून मॅक्स ओ’डॉड डावाच्या दुसऱ्या षटकात एक धाव करून बाद झाला.
https://prahaar.in/2026/06/17/possibility-of-deficient-rainfall-against-the-backdrop-of-el-nino/
टोरोंटोच्या मैदानावर आयसीसीची बंदी ?
खेळपट्टीवर अतिरिक बाऊन्स असल्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध कॅनडा सामना पंचांनी रद्द केला, पिचमधील असामन्या बाऊन्समुळे सामन्याच्या काही काळातच अनेक फलंदाज जखमी झाले. विशेष म्हणजे, याच खेळपट्टीवर यापूर्वी एक सामना खेळला गेला होता. कॅनडा-नेदरलँड्स सामन्याच्या चार दिवस आधी, १२ जून रोजी, आयसीसीने एक निवेदन जारी करून कळवले की, ८ जून रोजी अमेरिका विरुद्ध नेदरलँड्स एकदिवसीय सामन्यात वापरण्यात आलेली किंग सिटीची खेळपट्टी असमाधानकारक ठरवण्यात आली असून तिला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. अमेरिका आणि नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करणारे सामनाधिकारी फिल थॉम्पसन यांनी सांगितले की, खेळपट्टी सामन्याच्या दर्जापेक्षा निकृष्ट होती.
https://prahaar.in/2026/06/17/fifa-world-cup-2026-erling-haalands-double-strike-norway-off-to-a-winning-start-with-a-4-1-victory-over-iraq/
View this post on Instagram
आयसीसीच्या खेळपट्टी नियमानुसार,असमाधानकारक दर्जा मिळालेल्या खेळपट्टीला एक डिमेरिट पॉइंट मिळतो. खराब दर्जाच्या खेळपट्टीला तीन डिमेरिट पॉइंट्स मिळतात. हे डिमेरिट पॉइंट्स पाच वर्षांसाठी सक्रिय राहतात. सहा डिमेरिट पॉइंट्स जमा झालेल्या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास मनाई केली जाते.१२ डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास २४ महिन्यांची बंदी येते. दरम्यान, टोरोंटोच्या खेळपट्टीवरही बंदीची कारवाई होत आहे. तिला ४ डिमेरिट पॉइंट्स मिळाले आहेत, जे कोणत्याही खेळपट्टीसाठी अत्यंत हानिकारक आहे. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास, या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार नाहीत.