संजय राऊत यांचाही दुजोरा; एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत दाखल
उबाठा पक्षाच्या एकूण ९ खासदारांपैकी जे ५ खासदार गेल्या ‘नॉट रिचेबल’ होते आणि ज्यांनी दिल्ली गाठली आहे, त्यांची नावे आता समोर आली आहेत. त्यात संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. तर, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार सद्यस्थितीत उबाठा गटासोबत राहिल्याचे चित्र आहे.
राऊत, सावंत, देसाई दिल्लीत
या राजकीय भूकंपावर उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!” राऊत यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.