Home क्रीडा Ravichandra Ashwin : आर. आश्विन या पाकिस्तान खेळाडूसोबत एकत्र खेळणार ! दोघ एकाच संघात

Ravichandra Ashwin : आर. आश्विन या पाकिस्तान खेळाडूसोबत एकत्र खेळणार ! दोघ एकाच संघात

0
Ravichandra Ashwin : आर. आश्विन या पाकिस्तान खेळाडूसोबत एकत्र खेळणार ! दोघ एकाच संघात

मुंबई : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार केला असून, या स्पर्धेत खेळणारा तो पहिला माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.विशेष म्हणजे या संघात एका पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाचाही समावेश करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/16/major-shift-in-the-global-economy-%e0%a5%ad%e0%a5%a9-countries/

मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने २०२६ च्या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफलाही संघात समाविष्ट केले आहे.अश्विनही आता या संघाकडून खेळणार आहेच. हॅरिस रौफ सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत पहिल्या हंगामापासून म्हणजेच २०२३ पासून खेळत आहे.अश्विनही आता या संघाकडून खेळणार आहेच.हॅरिस रौफ सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत पहिल्या हंगामापासून म्हणजेच २०२३ पासून खेळत आहे.यामुळे सोशल मिडिया वर चर्चांना उधाण आले आहे.(Vaibhav Sooryvanshi)

https://prahaar.in/2026/06/16/nashiks-bhavika-ahire-to-lead-indias-under-19-womens-team/

भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिका बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. अशा परिस्थितीत, भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (MLC) मध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाकडून एकत्र खेळणार आहेत. अश्विन हा या अमेरिकन लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. या निमित्ताने, इतिहासामध्ये जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघाकडून (Locker Room) मैदानात उतरले आहेत, अशा काही प्रसंगांकडे आपण पाहूया.

https://prahaar.in/2026/06/16/fifa-worldcup-2026-indian-origin-players/

  1. मेजर लीग क्रिकेट (अमेरिका – २०२६): रविचंद्रन अश्विन आणि हॅरिस रौफ हे अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघातून एकत्र खेळत असून हा सध्या क्रीडा जगतात चर्चेचा विषय ठरला आहे.
  2. आफ्रो-आशिया कप (२००५-२००७): आशियाई एकादश (Asia XI) संघाकडून खेळताना भारताचे सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण हे पाकिस्तानच्या शोएब अख्तर, इंझमाम-उल-हक आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासोबत एकाच संघात खेळले होते.
  3. विल्स इंडिया आणि पाकिस्तान XI (श्रीलंका – १९९६): १९९६ च्या विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला पाठिंबा देण्यासाठी कोलंबोमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना झाला होता. यात सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझहरुद्दीन यांनी पाकिस्तानच्या वसीम अक्रम आणि वकार युनिस यांच्यासोबत मिळून ‘भारत-पाकिस्तान संयुक्त इलेव्हन’चे प्रतिनिधित्व केले होते.
  4. विभाजनापूर्वीचा इतिहास: अब्दुल हफीझ कारदार, आमीर इलाही आणि गुल मोहम्मद या तीन क्रिकेटपटूंनी फाळणीपूर्वी अखंड भारताकडून आणि नंतर १९५० च्या दशकात पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here