भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)’ प्रदान करण्यात आला आहे. स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी सोमवारी (१५ जून २०२६) राजधानी ब्रातिस्लावा येथे हा सन्मान पंतप्रधान मोदींना प्रदान केला.
या पुरस्कारासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जगातील ३३ देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याची नोंद झाली आहे. याआधी ३२ देशांनी त्यांना अशा प्रकारचे सन्मान प्रदान केले आहेत.
https://prahaar.in/2026/06/16/pm-modi-in-france-for-g7-summit-important-meetings-with-other-world-leaders/
दरम्यान, स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनीही मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांनी भारतातील राजकीय स्थैर्य आणि सलग १२ वर्षे पंतप्रधानपद भूषवण्याच्या मोदींच्या कामगिरीला “राजकीय चमत्कार” असे संबोधले. ब्रातिस्लावामध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत फिको म्हणाले की, एवढ्या विविध आणि गुंतागुंतीच्या राजकीय वातावरणात दीर्घकाळ नेतृत्व टिकवणे ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे. (PM Narendra Modi)
https://prahaar.in/2026/06/15/what-did-prime-minister-modi-say-about-the-friendship-between-india-and-slovakia/
View this post on Instagram