चाळीसगाव : रिक्षातून प्रवास करतांना नाशिक येथील महिला प्रवाशाकडील बॅगेतील सुमारे 9 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे दागिने चोरी झाले होते. या प्रकरणात चाळीसगाव येथील टाकळी प्र.चा. भागातील रिक्षा चालकाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. अंबड पोलिसांनी या घटनेची माहीती दिल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी शिताफीने तपास करून चाळीसगावच्या रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन अंबड पोलीसांच्या ताब्यात दिले.
https://prahaar.in/2026/06/16/soldier-on-leave-dies-in-a-horrific-accident/
नेमकी घटना काय ?
नलिनी धनाजी गोसावी रा.कालीकानगर, उंटवाडी, सिडको,नाशिक ह्या 25 मे 2026 रोजी आई व भावासह माहेरी कुरूकवाडी ता.शिंदखेडा येथे गेेेलेले होत्या. तेथून त्या 6 जून रोजी धुळे ते निमाणी बसने नाशिक येथे परत आल्या. निमाणी ते घरपर्यंत त्यांनी रिक्षा केली. रिक्षात त्यांचे भाऊ पुढे तर नलिनी गोसवी व त्यांच्या आई मागच्या सिटवर बसले.त्यांच्यासह आणखी दोन अनोळखी इसम मागे बसले. नलिनी गोसावी यांच्याजवळ सोन्याची दागिणे असलेली बॅग होती ती त्यांनी रिक्षात मागे ठेवली होती. रिक्षा चालकाने सिव्हील हॉस्पीटल जवळ गॅस संपल्याचे सांगत रिक्षातून उतरवत दुसर्या रिक्षात बसवले.रात्री 11.45 वाजेच्या सुमारास त्या घरी गेल्यावर त्यांनी बॅग उघडून पाहीले असता बॅगेत ठेवलेले सोन्याच्या दोन पोत, सोन्याचा नेकलेस व चांदीचें मनगटे असा सुमारे 9 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे दागिने हायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-fire-massive-blaze-in-nashik-fire-breaks-out-at-an-oil-warehouse-in-bhabha-nagar-fire-brought-under-control-with-the-help-of-10-fire-tenders/
नलिनी गोसावी यांनी दागिण्यांबाबत नातेवाईकांकडे विचारणा केली परंतू दागिणे मिळून आले नाही. त्यामुळे कुरूकवाडी ते घरापर्यंत रिक्षा तसेच बसमध्ये कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून हे दागिणे काढून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात दागिणे चोरीची फिर्याद दिली.
अंबड पोलीसांनी या गुन्ह्याच्या तपासात रवि घुमटकर रमेश जाधव व चाळीसगाव येथील रिक्षाचालक लखन सुकलाल पवार (32) रा. टाकळी प्र.चा.खरजई रेल्वे गेटजवळ यांचा सहभाग असल्याचे समोर आले. यात घुमतकर व जाधव यांना अंबड पोलीसांनी यापूर्वीच अटक केली असून त्यंाच्याकडून चोरी गेलेले दागिनेही हस्तगत केले आहे तर रिक्षाचालक लखल हा फरार होता.
https://prahaar.in/2026/06/16/nashik-crime-body-found-in-a-decomposed-state-inside-a-suitcase/
अंबड पोलीसांनी ही माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना दिल्यावर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहूल सोनवणे यांनी आरोपीचा मागोवा घेतला. उपनिरीक्षक सुभाष पाटील, एएसआय अजय मालचे, हवालदार राहूल सोनवणे, अंमलदार दत्तू साळवे, सुनील पाटील, अशोक पाटील, जितेंद्र वाघ यांच्या पथकाने शोध मोहीम राबवून रिक्षाचालक लखन पवार यास ताब्यात घेतले. पवार यास अंबड पोलीसांकडे सुुपुर्द करण्यात आले.