Home क्रीडा FIFA World Cup FIFA WORLDCUP 2026 : भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा; निशान वेलूपिल्लईच्या प्रवेशाने पुन्हा चर्चांना उधाण

FIFA WORLDCUP 2026 : भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा; निशान वेलूपिल्लईच्या प्रवेशाने पुन्हा चर्चांना उधाण

0
FIFA WORLDCUP 2026 : भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा; निशान वेलूपिल्लईच्या प्रवेशाने पुन्हा चर्चांना उधाण
Fifa World Cup 2026

फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ सध्या जगभरात सुरू आहे. युरोप आणि आफ्रिकेतील संघांची धडाकेबाज कामगिरी पाहून प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे “भारतीय फुटबॉल संघ जागतिक मंचावर कधी झळकणार?” मात्र, याच विश्वचषकात घडलेल्या एका घटनेने भारतीय फुटबॉल प्रेमींना सुखद धक्का दिला असून भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-irans-strong-comeback-match-against-new-zealand-ends-in-a-2-2-draw/

निशान वेलूपिल्लईने रचला इतिहास

ऑस्ट्रेलिया आणि टर्की यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात ६० व्या मिनिटाला जेव्हा ऑस्ट्रेलियाने ‘निशान वेलूपिल्लई’ला मैदानावर उतरवले, तेव्हा एक नवा इतिहास घडला. गेले २० वर्षे भारतीय फुटबॉल चाहते अशा एका क्षणाची वाट पाहत होते. निशान वेलूपिल्लईचे वडील तमिळ-श्रीलंकन असून आई अँग्लो-इंडियन आहे. पिवळ्या-हिरव्या ऑसी जर्सीमध्ये मैदानात उतरलेला हा खेळाडू आज जागतिक स्तरावर भारतीय प्रतिभेचा अभिमानास्पद चेहरा बनला आहे.

https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-thrilling-clash-between-saudi-arabia-and-uruguay-match-ends-in-a-1-1-draw/

विकाश धोरासूची आठवण

निशान वेलूपिल्लई हा काही पहिला भारतीय वंशाचा खेळाडू नाही. याआधी बरोबर २० वर्षांपूर्वी, २००६ च्या जर्मन फुटबॉल विश्वचषकात फ्रांसच्या संघातून ‘विकाश धोरासू’ या खेळाडूने भारताचे नाव उंचावले होते. मूळचे विशाखापट्टणमचे असलेले विकाश जेव्हा झिनेदिन झिदान, थिएरी हेन्री आणि लिलीयन थुराम यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरले होते, तेव्हा त्यांनी भारतीय चाहत्यांना भुरळ घातली होती.

https://prahaar.in/2026/06/16/fifa-world-cup-2026-egypt-vs-belgium-belgium-dampens-egypts-spirits-world-cup-match-ends-in-a-1-1-draw/

भारतीय प्रतिभेला जागतिक व्यासपीठ

विकाश धोरासू असो किंवा आजचा निशान वेलूपिल्लई, या खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे की भारतीय मूळ असलेल्या खेळाडूंमध्ये जागतिक दर्जाची क्षमता आहे. क्रिकेटच्या अफाट वेडात आपण अनेकदा फुटबॉलसारख्या लोकप्रिय खेळाकडे दुर्लक्ष करतो, परंतु जेव्हा एखादा ‘भारतीय’ फुटबॉलच्या या महाकुंभात चमकतो, तेव्हा संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावते.

या घटनेमुळे भारतीय फुटबॉल संघ कधी विश्वचषकाच्या रिंगणात उतरणार, हा प्रश्न पुन्हा एकदा फुटबॉल प्रेमींच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here