नालासोपारा : ‘वागळे की दुनिया’ आणि ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगले हिने गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. संचिता मुंबईजवळील नालासोपारा परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती आई वडील आणि बहीण अंजली यांच्यासोबत आचोळे गावातील घरात राहत होती.
https://prahaar.in/2026/06/15/64-percent-rainfall-deficit-in-the-country-16-states-including-maharashtra-await-rain/
काय झालं ५:३० च्या नंतर ?
रविवारी संध्याकाळी संचिता आणि तिची बहीण दोघीच होत्या. आई बाबा काही कामासाठी बाहेर गेले होते. धाकटी बहीण अंजली सायंकाळी सुमारास 5.30 वाजता काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरी कोणीही नाही हे पाहून संचिताने संध्याकाळी सुमारे 7.30 च्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गेली. बेडरूमला आतून कडी लावली आणि पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला. तिची बहीण आणि आई बाबा जेव्हा घरी परत आले तेव्हा हे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने संचिताला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
https://prahaar.in/2026/06/15/what-did-prime-minister-modi-say-about-the-friendship-between-india-and-slovakia/
प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारा पुरावा आढळून आलेला नाही. पण संचिताच्या चुलत भावाने एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याने एक सोशल मीडिया पोस्ट दाखवून पत्रकारांशी बोलताना संचिताची आत्महत्या आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या यात काहीतरी संबंध असल्याचा मुद्दा उपस्थित केला तसेच या प्रकरणी चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आता पोलीस संचिताच्या आयुष्यात मागील काही दिवसांत काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संचिता उगले आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.