-राहत्या घरात गळफास घेऊन संपले जीवनयात्रा
मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. संचिता २२ वर्षांची होती आणि मुंबईजवळील नालासोपारा परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. (Sanchita Ugale Suicide News)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान घडली. घटनेच्या वेळी संचिता घरी एकटी होती. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
https://prahaar.in/2026/06/15/uncles-anger-over-gutkha-packet-sister-hits-him-on-the-head-with-an-axe/
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता उगले हिने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
संचिता उगले ही ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागळे की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमुळे प्रेक्षकांच्या परिचयाची होती. तसेच तिने अनेक टीव्ही आणि चित्रपट प्रकल्पांमध्ये काम केले होते. विकी कौशल अभिनित ‘छावा’ चित्रपटात तिने ताराबाईची भूमिका साकारली होती.
https://prahaar.in/2026/06/15/vaibhav-sooryavanshi-disappointment-again-for-vaibhav-suryavanshi-the-same-mistake-proved-costly-dismissed-for-21-runs-against-sri-lanka-a/
तिच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून, सहकलाकार आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.