Home ब्रेकिंग न्यूज Solapur Accident :म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील अपघातात राज्य सरकारची मोठी कारवाई

Solapur Accident :म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील अपघातात राज्य सरकारची मोठी कारवाई

0
Solapur Accident :म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील अपघातात राज्य सरकारची मोठी कारवाई

सोलापूर : म्हसवड -पंढरपूर महामार्गावरील तांदळवाडीजवळ एक वेगाने प्रवास करत असलेले वाहन विहिरीत पडले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सहा जणांना वाचवले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच अपघात प्रकरणी नव्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/15/one-month-extension-for-sts-temporary-fare-hike-amidst-rising-fuel-prices/

नेमकं काय झालं ?

पंढरपूर येथील बावचे कुटुंबीय आणि नातेवाईक असे एकूण १४ जण एका पिकअपमधून देवदर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, तांदळवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघात होताच मोठा आवाज आला. आवाज ऐकताच स्थानिकांनी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले.

https://prahaar.in/2026/06/15/fifa-worldcup-2026-south-american-teams-not-performing-well/

स्थानिकांनी दिली धक्कादायक माहिती

अपघात ज्या भागात झाला त्या भागात रस्ता तयार करायला घेतला, तेव्हा रस्त्याची उंची खूप वाढवली गेली आणि स्थानिकांच्या जमिनी आणि विहीर खाली राहिल्या. रस्ता उंचावल्यामुळे अपघात होऊन गाड्या थेट विहिरीत जाऊ शकतात, हे ओळखून त्याचवेळी मजबूत संरक्षक भिंत अर्थात कठडा बांधण्याची मागणी केली होती. ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडीत जो अपघात झाला त्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. अपघातात सुदैवाने काही जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रूपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here