टेनिसविश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डनने (Wimbledon Championships 2026) यंदा बक्षीस रकमेत विक्रमी वाढ जाहीर करत खेळाडूंना मोठी भेट दिली आहे. २०२६ हंगामासाठी स्पर्धेच्या एकूण पारितोषिक रकमेत तब्बल २० टक्क्यांची वाढ करण्यात आली असून पुरुष आणि महिला एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी ३.६ दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे ४६ कोटी रुपये मिळणार आहेत. विम्बल्डनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वार्षिक बक्षीसवाढ मानली जात आहे.
विशेष म्हणजे, केवळ विजेत्यांनाच नव्हे तर स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही या वाढीचा मोठा फायदा होणार आहे. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूंनाही ८० हजार पौंडांचे बक्षीस मिळणार आहे. पात्रता फेरीतील खेळाडूंसाठीही बक्षीस रकमेत २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून खालच्या क्रमांकावरील खेळाडूंनाही आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Wimbledon Championships 2026)
https://prahaar.in/2026/06/14/fifa-worldcup-2026-scotland-vs-haiti-1-0/
मात्र, बक्षीस रकमेत मोठी वाढ जाहीर झाल्यानंतरही ग्रँडस्लॅम स्पर्धांचे आयोजक आणि खेळाडू यांच्यातील महसूल वाटपाचा मुद्दा अद्याप कायम आहे. अनेक आघाडीच्या खेळाडूंनी स्पर्धांच्या वाढत्या उत्पन्नाच्या तुलनेत खेळाडूंना अधिक वाटा मिळावा, अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आणली आहे. त्यांचे मत आहे की, ग्रँडस्लॅम स्पर्धांमधून निर्माण होणाऱ्या अब्जावधी रुपयांच्या उत्पन्नात खेळाडूंचा हिस्सा अधिक असायला हवा. (Wimbledon Championships 2026)
https://prahaar.in/2026/06/14/women-t20-world-cup-2026-ind-vs-pak-major-setback-for-pakistan-ahead-of-the-big-clash-against-india-captain-fatima-sana-is-injured-her-participation-is-uncertain/
दरम्यान, जून महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या विम्बल्डन २०२६ स्पर्धेकडे जगभरातील टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे. विक्रमी बक्षीस रक्कम, अव्वल खेळाडूंची उपस्थिती आणि प्रतिष्ठेच्या किताबासाठी होणारी चुरस यामुळे यंदाचा विम्बल्डन हंगाम अधिक रंगतदार ठरणार असल्याची चर्चा टेनिस वर्तुळात सुरू आहे. (Wimbledon Championships 2026)