Home ब्रेकिंग न्यूज Cocktail 2 : अरे.. रुको…! पुण्यात शाहिद, क्रिती,रश्मिकाला चाहत्यांची धक्काबुक्की

Cocktail 2 : अरे.. रुको…! पुण्यात शाहिद, क्रिती,रश्मिकाला चाहत्यांची धक्काबुक्की

0
Cocktail 2 : अरे.. रुको…! पुण्यात शाहिद, क्रिती,रश्मिकाला चाहत्यांची धक्काबुक्की

-फिनिक्स मॉलमधील कार्यक्रमात मोठा गोंधळ

पुणे:  पुण्यातील विमाननगर येथील फिनिक्स मॉलमध्ये (Phoenix Pune) शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉकटेल २’ (Cocktail 2) चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाला. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor), अभिनेत्री क्रिती सेनॉन  (Kriti Sanon) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याने कार्यक्रमात अव्यवस्था निर्माण झाली.

मँडॉक फिल्म्सतर्फे मॉलमधील ‘अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी कोणतेही तिकीट किंवा प्रवेश शुल्क नसल्याने हजारो चाहते मॉलमध्ये दाखल झाले. कलाकार मंचावर येताच चाहत्यांचा उत्साह अनावर झाला आणि अनेकांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स ओलांडून थेट स्टेजकडे धाव घेतली.

https://prahaar.in/2026/06/14/horrific-accident-on-the-bhandara-sakoli-highway-speeding-unidentified-vehicle-hits-two-killed-on-the-spot/

अचानक वाढलेल्या गर्दीमुळे सुरक्षा व्यवस्था कोलमडली. बाऊन्सर्स आणि सुरक्षा रक्षकांना परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले. याच गोंधळात काही व्हिडिओ जर्नलिस्ट आणि छायाचित्रकार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अभिनेता शाहिद कपूर यांनाही गर्दीतून मार्ग काढताना धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आयोजकांनी कार्यक्रम तातडीने आटोपता घेतला आणि कलाकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

https://prahaar.in/2026/06/14/another-comedian-in-the-spotlight-following-the-pranit-more-controversy-madhur-virli-faces-social-media-backlash-over-a-joke-about-a-sensitive-topic/

मॉल प्रशासनाने कलाकारांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गाची व्यवस्था न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप उपस्थितांनी केला आहे. दरम्यान, या गोंधळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here