फ्रान्समधील ‘भारत इनोव्ह्हेट्स’ सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नाईस (फ्रान्स) : भारताच्या तरुणांची मानसिकता नाविन्यपूर्ण असून, ती संपूर्ण मानवतेचा विचार करते. भारत आज केवळ संकुचित व्यावसायिक हितसंबंधांसाठी काम न करता मानवतेच्या कल्याणासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी जागतिक स्तरावर नवनवीन शोध लावत आहे. नाविन्यता (इनोव्हेशन) ही भारताच्या डीएनएमध्येच आहे,” असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. फ्रान्समधील नीस येथे आयोजित ‘भारत इनोव्ह्हेट्स’ या भव्य व्यासपीठाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विशेष उपस्थिती होती.
https://prahaar.in/2026/06/14/we-are-not-hitler-channels-of-dialogue-must-be-kept-open/
पंतप्रधान मोदींनी भारताच्या बदलत्या प्रतिमेवर प्रकाश टाकत सांगितले की, भारत हा जागतिक इनोव्हेशनमधील एक उगवती शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नसून, जगाला विविध क्षेत्रांत उपाय पुरवणारा देश बनत आहे. भारतात सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम कार्यरत आहे. या प्रदर्शनात जरी १००-१२५ स्टार्टअप्स दिसत असले, तरी भारताकडे आज २ लाखांहून अधिक स्टार्टअप्सचा अथांग पूल सज्ज आहे, जो जागतिक अर्थव्यवस्थेला गती देत आहे. हजारो वर्षांपूर्वी भारताने वैद्यकशास्त्र, योग, गणित आणि विज्ञान या क्षेत्रांतील आपल्या अद्वितीय योगदानातून मानवतेच्या प्रगतीला आकार दिला होता, त्याच वारशाचा विस्तार आजचा तरुण करत आहे.पंतप्रधानांनी जगभरातील गुंतवणूकदार, नामांकित विद्यापीठे, संशोधन संस्था आणि अग्रगण्य उद्योजकांना भारतासोबत भागीदारी करण्याचे थेट आवाहन केले. भारत इनोव्ह्हेट्स’ हे जगासाठी भारतासोबत जागतिक नवसंशोधनाचा पुढील अध्याय लिहिण्याचे एक सशक्त माध्यम आहे. भारतात या, आमच्यासोबत काम करा. ‘डिझाइन इन इंडिया’ आणि ‘डेव्हलप इन इंडिया’ च्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी शाश्वत उपाय शोधा.
https://prahaar.in/2026/06/14/minister-nitesh-rane-will-take-the-historic-city-of-sawantwadi-to-the-international-level-minister-nitesh-rane/
भारत-फ्रान्स संबंधांचे पंचसूत्र
दोन्ही देशांमधील मजबूत आणि धोरणात्मक संबंधांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्सचे नाते हे “कनेक्शन (संपर्क), कन्व्हिक्शन (विश्वास), इनोव्हेशन (नाविन्यता), इन्स्पिरेशन (प्रेरणा) आणि सामायिक दृष्टीकोन ” या पंचसूत्रीवर आधारित आहे. जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी नेहमीच एकत्र पावले टाकली असून, हा नवा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. या प्रसंगी बोलताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचा “इनोव्हेशनचा देश” असा गौरव केला आणि भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला फ्रान्सचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
https://prahaar.in/2026/06/14/we-are-not-hitler-channels-of-dialogue-must-be-kept-open/
विविध क्षेत्रांत भागीदारी
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत फ्रान्सने भारतासोबत अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाची धोरणात्मक भागीदारी केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लायमेट ॲक्शन (हवामान बदल) यांसारख्या गंभीर व जागतिक आव्हानांच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश अत्यंत मजबुतीने एकत्र काम करत आहेत. स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सच्या विकासासह नागरी अणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य आगामी काळात आणखी वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.