Home देश Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश

Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश

0
Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश
Jharkhand Thundersorm

झारखंड : झारखंडमध्ये (Jharkhand) मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) काळात वीज कोसळण्याच्या (Lightning Strike) घटनांमध्ये गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका १० वर्षीय मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची (Ranchi) आणि गरवा (Garhwa) जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून दोन्ही ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रांची जिल्ह्यातील पिथोरिया (Pithoria) परिसरातील बरहू गावचे जितू महाली (५५) आणि कटमकुली गावातील निराशा देवी (३३) हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/06/14/indrayani-river-fish-heaps-of-dead-fish-found-in-the-indrayani-river-at-dehu-pollution-issue-comes-to-the-fore-again-ahead-of-ashadhi-wari/

दरम्यान, गरवा जिल्ह्यातील सुंडी गावातील रीना देवी (३०) आणि मुकुंदपूर गावातील राम अवतार पाल (६५) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय छत्रा (Chatra), गिरिडीह (Giridih) आणि सेराईकेला-खरसावन (Seraikela-Kharsawan) जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी तीन जणांचा जीव गेला.

झारखंडमध्ये सध्या हवामानातील (Weather) बदलांमुळे वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासनाने (Administration) नागरिकांना सतर्क (Alert) राहण्याचे आवाहन केले आहे.