Home ताज्या घडामोडी Mouni Roy: मला सगळ्यांना सांगायचं की मी गे… अभिनेत्री मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया

Mouni Roy: मला सगळ्यांना सांगायचं की मी गे… अभिनेत्री मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया

0
Mouni Roy: मला सगळ्यांना सांगायचं की मी गे… अभिनेत्री मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्यासोबतच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान आता मौनीने तिच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या अफवांवर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.

अलीकडेच  मोनिका शर्मा (Monika Sharma) यांच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत मौनी रॉयने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि अफवांबाबत भाष्य केले. तिच्याबद्दल पसरलेल्या सर्वात विचित्र अफवेबद्दल विचारले असता ती म्हणाली, “अरे, ती अफवा की मी गे आहे. पण मला सगळ्यांना सांगायचे आहे की मी गे नाही आहे.”

https://prahaar.in/2026/06/14/mumbai-ahmedabad-bullet-train-when-will-indias-first-bullet-train-run-railway-minister-gives-a-major-update/

गेल्या काही काळात सोशल मीडियावर काही युजर्सनी मौनीचे नाव अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिच्यासोबत जोडले होते. त्यानंतर तिच्या लैंगिकतेबाबत विविध चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, मौनीने या सर्व अफवांना हलक्याफुलक्या शैलीत उत्तर देत त्याकडे फारसे लक्ष न देण्याचा संकेत दिला.

यावेळी तिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलही मोकळेपणाने संवाद साधला. वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मात्र कुटुंबीय आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे ती त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकली, असे तिने सांगितले.

मौनी म्हणाली, “मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्याकडे असे मित्र आणि कुटुंब आहे, जे प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी कठीण प्रसंगांना सामोरे जाऊ शकले.”

https://prahaar.in/2026/06/14/wimbledon-2026-a-windfall-for-wimbledon-winners-the-champion-will-receive-a-prize-of-a-whopping-%e2%82%b946-crore/

तिने विशेषतः आपल्या मैत्रिणींचे कौतुक करत सांगितले की, “चांगला काळ असो किंवा वाईट, माझ्या मैत्रिणी नेहमी माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. आयुष्यात अशा मजबूत आणि प्रेरणादायी स्त्रिया असणे खूप महत्त्वाचे असते.”

दरम्यान, मौनीच्या या वक्तव्यानंतर तिच्याबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here