Home क्रीडा PV Sindhu : सिंधूचे ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतले आव्हान संपले

PV Sindhu : सिंधूचे ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतले आव्हान संपले

0
PV Sindhu : सिंधूचे ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतले आव्हान संपले

सिडनी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील विजेतेपदाची आशा उपांत्य फेरीतच संपुष्टात आली. विद्यमान विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुची हिने सिंधूचा २२-२०, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

https://prahaar.in/2026/06/13/ind-vs-afg-gurbazs-explosive-century-yet-afghanistan-bowled-out-for-194-who-took-the-most-wickets/

जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने पहिल्या गेममध्ये दमदार सुरुवात केली. मध्यंतरापर्यंत तिने आघाडी राखली होती. मात्र त्यानंतर यामागुचीने सलग सहा गुणांची कमाई करत सामन्यावर पकड मजबूत केली. सिंधूने पुनरागमन करत सामना चुरशीचा बनवला आणि २०-१९ अशा स्थितीत गेम पॉइंटही वाचवला; परंतु अखेरीस तिला पहिला गेम गमवावा लागला. दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले. सलग सात गुण जिंकत तिने १३-६ अशी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवत सामना आपल्या नावावर केला.

https://prahaar.in/2026/06/13/spain-to-win-fifa-world-cup-2026-ai-prediction/

२०२६ हंगामातील बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील सिंधूची ही दुसरी उपांत्य फेरी ठरली. याआधी जानेवारीमध्ये झालेल्या मलेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेतही ती अंतिम चारमध्ये पोहोचली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपनमधील भारताचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरी गटात एम. आर. अर्जुन आणि हरिहरन आम्साकरुणन यांना उपांत्यपूर्व फेरीतील सामना दुखापतीमुळे अर्धवट सोडावा लागला, तर पुरुष एकेरीतील कोणत्याही भारतीय खेळाडूला पहिल्या फेरीपलीकडे मजल मारता आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here